ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद ब्रम्हपुरी अंतर्गत बांधण्यात आलेले जलतरण तलावाचे मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- दिनांक १९/०२/२०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य तथा आमदार – ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांचे शुभहस्ते पडला.

सदर जलतरण तलाव शहरातील नागरिकांकरिता लवकरच खुला करून देण्यात येणार असून त्यामुळे जलतरण प्रेमी मुले,नागरिक यांना आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल व शहरातून उच्च दर्जाचे जलतरण खेळाडू तयार होण्यास वाव मिळेल.. रू.५.०० कोटी निधी खर्च करून बांधण्यात आलेले असे भव्य दिव्य जलतरण तलाव परिसरातील एकमेव असून यामुळे शहराचे सौंदर्यात व विकासात भर पडणार आहे,असे मनोगत मान.आमदार महोदयांनी केले.

यावेळी सदर जलतरण तलाव बाह्य यंत्रणेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच सामान्य नागरिकांकरीता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मान. प्रशासक तथा मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी दिले. सदर कार्यक्रमाप्रसंगी नगर परिषद ब्रम्हपुरी चे माजी नगराध्यक्ष सौ. रिता ताई दीपक उराडे, माजी उपाध्यक्ष श्री.अशोक रामटेके तथा सर्व माजी पदाधिकारी तथा सदस्य,शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर, पत्रकार महोदय व खेळाडू ,नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये