Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक योग, संगीत व वटपौर्णिमा दिनानिमित्याने वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     जागतिक योग व संगीत दिन तथा वटपौर्णिमा महोत्सवा निमित्त भारतीय युवा संस्कार परीषद व निसर्गानंद ग्राम विकास प्रतिष्ठिन हिंगनघाट यांचे संयुक्त विद्यमाने गोल बाजार परीसर जुनी श्रीराम टाँकीज येथे वृक्षारोपण करण्यात आले, केवळ वडाचेच नाही तर पर्यावरण पुरक अशा कडूनिंब, बहावा, बकुल, कदंब झाडांची लागवड करण्यात आली. दरवर्षी भारतीय युवा संस्कार परीषद वटपौर्णिमा दिनानिमित्य एक झाड वडाचे हा वृक्षारोपण उपक्रम राबवित असते, पर्यावरणात होणारा बदल हा मनुष्याचे जीवनमानावर व आरोग्यमय बाबीला परिणामकारक तापमान वाढीने तथा जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असता आपली वसुंधरा सृष्टी, वृक्षवल्ली, वाचविण्याचे कार्य आपणांस करावे लागणार आहे असे मत राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव तथा भा.युवा संस्कार परीषदेचे संस्थापक प्रदीपकुमार नागपुरकर यांनी वृक्षारोपण प्रसंगी व्यक्त केले.

वटपौर्णिमा व जागतिक योग व संगीत दिन असल्याने मनुष्य निरोगी असावा तसेच संगीतमय स्वर निनादावा असे आपणाला वाटत असेल तर निसर्गमय सृष्टि समतोल राखण्याचे कार्य समाजाने अंगिकार केले पाहिजे तरचं मनुष्य आनंदीत जगू शकतो असे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे माजी सभापति वासुदेवराव गौळकार म्हणाले. लोकसहभागातून वृक्ष लावू झाडाचे संवर्धन करु ह्या अभियानात सामाजिक कार्यकर्ते प्रा. उमेश ढोबळे, राजेश मुन, राहुल राजकुमार खियानी, लक्ष्मण महाकाळे,प्रशांत भोयर, ईश्वर शिरपुरकर, समीर देवतळे, ऋषिकेश पाथरकर, राजु पुसदेकर, मनोहर कामठे, मोहित वानखेडे, विजय पोहरकर, पाडुरंग सलामे, कु.पुर्वी जगताप, प्रतिक्षा वरघणे,प्रिया भोमले, चेतन काळे, भायुसंप संयोजक अमोल भोमले, आदींनी वृक्षारोपण प्रसंगी सहकार्य करुन या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्विकारली.

यावेळी निखीता अमोल भोमले हिचे वाढदिवस व वटपौर्णिमा औचित्याने तीला वटवृक्ष भेट देत पर्यावरणाचा समतोल साधून आपली वसुंधरा सुजलाम सुफलाम व्हावी, हा कर्तव्याचा भाग समजून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी वटवृक्षाची पुजन करीत वटवृक्ष रोपण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये