ताज्या घडामोडी

जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा

एकूण ४३१ अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा आज दिनांक २१ /०६/२०२४ ला सकाळी ०५.०० वाजे पासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू झाली. जिल्यात पोलीस शिपाई पदाकरिता एकूण २० पद भरावयाचे आहे त्याकरिता एकूण २०९१ फॉर्म प्राप्त झाले असून यात पुरुष उमेदवार १७५६, महिला उमेदवार ३४४ तसेच ०१ तृतीय पंथी उमेदवार यांचा समावेश आहे त्यापैकी आज दिनांक २१-०६-२०२४ एकूण ६०० उमेदवारांना शारीरिक चाचणी करिता बोलाविण्यात आले होते, त्यापैकी २०३ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली, दरम्यान १२ उमेदवारांना तारीख बदलवून देण्यात आली.

शारीरिक चाचणीत उंच उडी, गोळा फेक, १०० मीटर, ८०० मीटर, १६०० मीटर धावणे याचा समावेश करण्यात आला आहे.

भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता एकूण ४३१ अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जिल्ह्यात दिनांक १९,२०,२१, आणि २२ जून २०२४ पर्यंत सदर प्रक्रिया सुरु राहील.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये