Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा तालुक्यातील चिंचोली जहागीर शिवारात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा यांनी शेतकरी यांच्या शेतात वनविभागाची जमीन आहे असे सांगून नाल्या खोदण्याचे काम करण्यात आले, परंतु काहाळे यांच्या शेतात पोकलैडने विहिरीचे काम करीत असताना पोकलैडवर करवाई करत नाही,आणि वनविभाग सामान्य शेतकरी यांच्यावर कारवाई करते असे का? शेतकरी यांच्यावर कारवाई करण्याअगोदर वनविभागाने पोकलैडने धारकावर करवाई अपेक्षित होती परंतु तसे झाले नाही.

जर वनविभाग सामंजस्याने प्रकरण निकाली काढण्याच्या उद्देशाने वनविभागाने वनविभागाची हद्द सिध्द करायला पाहिजे, परंतु तसे न करता मोजक्याच शेतकरी वर्गाला पेरणीच्या काळात त्रास देने कितपत योग्य आहे? पेरणीचा हंगाम सुरु आहे याच काळात वनविभागाला जाग का येते,याचा विचार व्हायला हवा. कोणाच्या सांगण्यावरून याबाबतचे काम होत तर नाही ना अश्याप्रकाराची शंका निर्माण झाली आहे.पेरणीच्या हंगामाच्या अगोदर वनविभागाने त्यांच्या ताब्यात आसलेल्या जमिनीबाबत मोजणी करून सर्वच प्रकारच्या अडचणीचा विषय स्पष्ठ करायला हवा होता परंतू शेत पेरल्यानंतरचं का?त्याचप्रमाणें इतरही ठिकाणी वनविभागाच्या जागेत अतिक्रमणे असतील ते पक्षपाताची भूमिका न घेता काढायला पहिजे.जगाचा पोशिंदा जो आहे त्यांच्यावर कारवाई होते, आणि जेसीबी किंवा पोकलैड यांच्यावर कारवाई का होत नाही? आपण यांना पाठीशी का घालत आहात? याप्रकरणात आर्थिक व्यवहार झालेला तर नाही ना? यासारखे असंख्य प्रश्न सामान्य जनतेत निर्माण झाले आहे,त्यामुळे जे दोषी असतील ते वनविभागाचे अधिकारी का असत नाही, जो दोषी असेल त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे,जर झाली नाही तर… याही पेक्षा लोकशाही मार्गाने मनसेच्या वतीने त्रिवआंदोलन छेडण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.

झालेली कारवाई आकसापोटी आहे किंवा नाही याची ही चौकशी व्हायला हवी अशी स्पष्ठ भूमिका मनसे वि.से बुलडाणा अध्यक्ष शिवादादा पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे, तसेच वरील विषयाचे मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन दिनांक 21/06/2024 रोजी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा यांच्या कार्यालयात करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतीतचे निवेदन दिनांक 18/06/2024 ला देण्यात आले आहे तेव्हा शिवादादा पुरंदरे (जिल्हाध्यक्ष मनसे वी.से), अतिष राजे, अभी देशमुख, तालुका अध्यक्ष बंडू डोळस, शहर अध्यक्ष नवनाथ रामाने.शहर उपाध्यक्ष आकाश डोळस,मनविसे शहर अध्यक्ष राजु साबळे,उपाध्यक्ष सौरभ कोरडे, युवा नेते विशाल चव्हाण, नवनाथ रामाणे, व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये