गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्नीने प्रियकराच्या मदतीने प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची कट रचुन केली निघृण हत्या

देवळी पोलीसांनी 54 दिवसांनी केली खुनाच्या गुन्हयाची उकल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनांक 18.04.2024 रोजी फिर्यादी नामे मोहन लक्ष्मण तोडासे, वय 26 वर्ष, धंदा खाजगी नौकरी (पोलीस पाटील) ता.जि. वर्धा यांनी तोंडी तकार दिल्यावरून पोस्टे देवळी मर्ग क. 23/2024 कलम 174 जाफौचा करण्यात आला. सदर मर्गमधील मृतक हा एक अनोळखी पुरूष वय अंदाजे 35 वर्ष हा होता. सदर मर्गचा तपास देवळी पोलीस स्टेशनचे सफौ प्रकाश निमजे यांचेकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान दिनांक 27.04.2024 रोजी महिला नामे सारीका सचिन घरत, रा. गाडगेनगर, पुलगांव ही देवळी पोलीस स्टेशनला आली व तिचा पती नामे सचिन दिपक घरत हा गेले 10 ते 12 दिवसापासुन मिसींग होता व या बाबतीत तिने पो. स्टे पुलगाव येथे मिसींग तकार दिलेबाबत सांगीतले व पुलगाव पोलीसांनी तिला पोलीस स्टेशन देवळी येथे एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळुन आला आहे तरी तेथे जावुन शहानीशा करावी बाबत सुचविले.

त्यावरून सदर महिला व तिच्या नातेवाईकांनी देवळी पोलीस स्टेशनला येवुन मयताची ओळख पटवली. त्यावेळी कोणीही मृतकाचे मृत्युबददल संशय व्यक्त केलेला नाही. नंतर काही दिवसांनी सदर मर्गमधील मृतकाचे वडील नामे दिपक घरत यांनी सहायक पोलीस अधीक्षक श्री. राहुल चव्हाण सा. यांची भेट घेवुन त्यांच्या मुलाचा मृत्यु हा नैसर्गीक नसुन घातपात आहे असा संशय व्यक्त केला व तसा अर्ज पोलीस स्टेशन देवळी येथे दिनांक 22.05.2024 रोजी दिला. सदर अर्जातील आरोपाच्या अनुषंगाने सखोल तपास मा. श्री राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधीकारी सा, पुलगाव व ठाणेदार देवळी श्री. सार्थक नेहेते यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सफौ प्रकाश निमजे यांनी केला. सफौ प्रकाश निमजे यांनी आपला अनुभव, तपास कौशल्य व तांत्रीक बाबींचा वापर करून तपासा अंती मयताची पत्नी सारीका हिचे आपटी ता. देवळी येथील राहनारा सुरज करलुके याचे सोबत अनैतिक विवाहबाह्य संबंध असल्याचे निष्पन्न केले व प्रेमसंबंधास विक्की आमदरे हा सुध्दा त्यांना मदत करीत असल्याची माहिती मिळाल्यावर तपासाची सुई त्या दिशेने वळवली. मयताची पत्नी सारीका हिला विचारपुस केली असता. तिने सांगीतले की, दिनांक 16.04.2024 रोजी तिचा पुलगाव बसस्टॅन्ड येथे दुपारी 04.00 वाजताचे सुमारास पती मृतक सचिन घरत याचेशी वाद झाला होता व ती दोन्ही मुलींसह बसस्टॅन्डवर लपुन बसली होती व संध्याकाळी 07.00 वाजताचे पुलगाव ते कळंब बसमध्ये बसुन 07.30 वाजता विजयगोपाल या गावी तिच्या मैत्रीणीच्या घरी मुक्कामी थांबली होती. पोनि नेहेते व सफौ निमजे यांनी विजयगोपाल येथे जाऊन मैत्रीणीकडे व परीसरात विचारपुस केली असता माहिती मिळाली की, सारीका ही दिनांक 16.04.2024 रोजी 07.30 वाजता नाही तर ती रात्री 11.30 वाजता विजयगोपाल येथे पोहचली होती.

मृतकाचे पत्नीचे बयानात तफावत आल्याने पोनि नेहेते व सफौ निमजे यांनी तिच्यावर तसेच तिचा प्रियकर सुरज करलुके यांच्यावर तपासाची दिशा केंद्रीत केली. सारीकाचा प्रियकर सुरज करलुके याला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता. त्याने सांगीतले की, तो 16.04.2024 रोजी त्याची टाटा एस मालवाहु गाडीने ट्रिप घेवुन दुपारी 01.00 वाजताचे सुमारास बाभुळगाव येथे गेला होता व दुपारी 05.00 वाजताचे सुमारास आपटी येथे परत आला व त्या नंतर त्यादिवसी तो कुठेच बाहेर गेला नाही. त्याचा मित्र विक्की आमदरे यांने देखील याच प्रमाणे हकीकत सांगीतली परंतु पोलीसांच्या तपासात व त्यांचे कथनात प्रचंड तफावत येत होती. तांत्रीक कौशल्याने व गुप्त बातमीदारामार्फत पोनि नेहेते व सफौ निमजे यांनी माहिती मिळवली की, 16.04.2024 ला मृतक सचिन घरत, संशयीत सुरज करलुके व त्याचा मित्र विक्की आमदरे हे सोबतच एकाच ठिकाणी दारू पिले होते. काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आल्याने पोनि नेहेते व सफौ निमजे यांनी सदरची माहिती मा.श्री. राहुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगांव यांना दिली. लगेचच पोलीसांनी सुरज करलुके, विक्की आमदरे व सारीका घरत यांना चौकशी करीता ताब्यात घेवुन विचारपुस केली. परंतु तिन्ही आरोपी निगरगट्ट असल्याने त्यांनी सुरूवातीला प्रतिसाद दिला नाही.

परंतु तिघांना वेगवेगळे बसवुन विचारपुस केली असता. त्यांचे पितळ उघडे पडले. व आता आपल्याजवळ गुन्हा कबुल केल्याशिवाय पर्याय नाही. अशी खात्री पटल्यावर सुरज करलुके पोपटासारखा बोलायला लागला व त्याने सांगीतले की, सुमारे 08 महिण्यापुर्वी त्याची सारीका घरत हिच्याशी ओळख झाली होती. सुरज करलुके हा स्वतःचे टाटा एस गाडीत महिलांना मजुरीसाठी नेत असे त्यात सारीका देखील होती. दोघांची प्रथम ओळख व ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. परंतु त्यांच्या भेटण्यामध्ये सारीकाचा पती सचिन हा अडसर ठरत होता. सचिन हा सारीकाच्या चारीन्यावर नेहमी संशय घ्यायचा व दारू पिवुन तिला मारहाण करायचा. ती या प्रकाराला प्रचंड वैतागली होती. तिने 14.04.2024 रोजी सुरजला निर्वाणीचा इशारा दिला की, आपल्याला कसेही करून सचिनला संपवावेच लागेल. त्यानुसार सुरजने त्याचा मित्र विक्की आमदरे याला सुध्दा सदर कटात सामिल करून घेतले. दिनांक 16.04.2024 रोजी रेल्वेस्टेशन पुलगाव येथे तिघे भेटले व ठरल्यानुसार विक्की व सुरज यांनी विटाळा येथे नेवुन सचिन याला प्रचंड दारू पाजली व मोटर सायकलवर बसवुन त्याला नाचनगाव कॅनल जवळील निर्मनुष्य रोडवर नेवुन गळा दावुन त्याची हत्या केली व सुरज याने स्वतःचे टाटा एस गाडीत सचिनचे प्रेत टाकुन सारीका, सुरज व विक्की यांनी पो.स्टे पुलगाव हददीतील हिवरा कावरे गावा जवळील वर्धा नदीचे पुलावर नेऊन तेथे कठडे तुटलेल्या ठिकाणा वरून प्रेत पाण्यात फेकुन त्याची विल्हेवाट लावली व जणु काही झालेच नाही अशा अविर्भावात सामान्य आयुष्य जगायला सुरवात केली. परंतु देवळी पोलीसांनी अंत्यत कौशल्याने सदरचा किचकट गुन्हा उघडकीस आणला व तिन्ही आरोपींना गजाआड केले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. नुरुल हसन, सा (भापोसे) मा.अप्पर पोलीस अधीक्षक, डॉ. श्री. सागर रतनकुमार कवडे सा, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक, श्री. राहुल चव्हाण, सा (भापोसे)यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देवळी ठाणेदार श्री. सार्थक प्र. नेहेते, व सफौ प्रकाश निमजे यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये