ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूरातील त्या तीन मित्रांची आयआयटीला गवसनी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

      शहरातील तीन मित्रांनी आय.आय.टी.मेन्स उत्तम मार्गानी उत्तीर्ण करत ऍडव्हान्स परीक्षेतही घवघवीत यश संपादन केल्याने त्यांच्यावर बल्लारपूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       हर्षल नवघरे संचालित आकाश गुरुकुल येथील हे तिघेही विध्यार्थी आहेत.

यात सच्चक कांबळे या विद्यार्थ्याने आयआयटी मेन मध्ये ९२.३१ टक्के गुण घेत ३०४७ वी रॅंक मिळवली तर फिनिक्स सोनारकर या विध्यार्थ्याने ८९.२० टक्के गुण घेत ३९५४ वी रॅंक मिळवली तर वसंत अटकूरी या विध्यार्थ्याने ७४.८९ गुण घेत ५७२६ वी रॅंक मिळवली आहे. महत्वाचे म्हणजे हे तीनही विध्यार्थी १२ परीक्षेतही टॉपर आहेत.हे तिघेही चांगले मित्र असून आकाश गुरुकुल येथील विद्यार्थी आहेत.त्यांनी संपादीत केलेल्या यशाने बल्लारपूर शहराचे नाव गौरवन्वित केले आहे.

या मित्रांनी मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकताच या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्थानिक गोपाला सेलिब्रेशन हॉल येथे गौरव करण्यात आला. सोशल मीडिया पासून दूर राहून अभ्यासाचे सातत्य कायम ठेवल्यानेच आपण ही मजल गाठू शकलो,अभ्यासातील प्रखर मेहनत,वेळेचे नियोजन करून अभ्यास केला तर इच्छाशक्ती असलेला विध्यार्थी हे शिखर गाठतो, तेव्हा खूप मेहनत करा यशस्वी हा असा सल्लाही त्यांनी विध्यार्थ्यांना दिला.या विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आकाश गुरुकुलचे संचालक हर्षल नवघरे,आपले आई-वडील, आणी या विद्यार्थ्यांना वेळेवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सोशल इज्युकेशन मोमेन्टच्या जिल्हाध्यक्षा तथा पुरोगामी साहित्य संसदेच्या विदर्भ अध्यक्षा ऍड.योगिता प्रकाश रायपूरे यांना दिले आहे.

        त्या विद्यार्थ्यांवर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून राज्याचे मत्सव्यवसाय,संस्कृतिक कार्यक्रम मंत्री,वन मंत्री,तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार,पवन भगत, इंजि.राकेश सोमाणी,समाजिक कार्यकर्ते सुमित उर्फ गोलू डोहाणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बादल उराडे,युथ काँग्रेसचे नेते चेतन गेडाम,समाजिक कार्यकर्ते भुरूभाई,राकेश पायताडे गुरुजी इत्यादींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये