Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच – एमआयडीसी कडून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांना ठेंगा

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन उभारू : अन्नदाता एकता मंच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

एमआयडीसी (Nippon tendro) पिपरी, कोची, चिरादेवी,चारगाव, तेलवासा, ढोरवासा, गवराळा, बाबतीत विजासन तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय भद्रावती येते एमआयडीसी अधिकारी यांच्या उपस्थितीत दि. 27 मे रोजी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मांडत असताना कुठल्याही प्रकारचे उत्तर एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून मिळाले नाही,उलट सीमा भागांची मोजणी होणारच असे स्पष्ट सांगत होते.मात्र २८ वर्ष लोटून सुद्धा कुठलेही एमआयडीसी जमिनीचे डेव्हलपमेंट न करता त्या अधिग्रहित केलेल्या जमिनी एमआयडीसी च्या चुकीच्या धोरणामुळे पडीत राहिली.त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची एक पिढी बरबाद झाली यावर मात्र अधिकारी बोलायला तयार नाही.आणि कुठलेही ठोस उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे देत होते.आणि एमआयडीसी ने एकत्रित बैठक न घेता गावाचे विभाजन करून होणारा विरोध कसा टाळता येईल याची खबरदारी घेतली.त्यामुळे २८ मे पासून सीमा मोजणी सुरू केली आहे.१९९६ नुसार शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम ही अत्यंत अल्प असून सुद्धा शेतकऱ्यांना २०२४ च्या बाजार भावानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकय्रांनी मागणी केली मात्र त्यावर मात्र उत्तर देणे टाळल.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वारंवार याबाबत प्रशासन आणि सरकारकडे पाठपुरवठा केला,मात्र त्यावर गांभीर्याने लक्ष न देता एमआयडीसी च्या बाजूने झुकते माप असल्याचे दिसून येत आहे.मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकरी मिळून आंदोलन करण्याचा इशारा अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये