Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासून विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढ करावी – एस तोटावार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

           महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून वन्सडी येथे शेतकरी कार्यशाळा जीएसटी कंपनी व कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये बियाण्याचा काळाबाजार शेतकऱ्याची पिळवणूक व उत्कृष्ट जातीचे बियाणे वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी तांत्रिक दृष्ट्या बियाण्याची निवड प्रक्रिया व लागवड पद्धती याचा अवलंब केल्यास तेलबिया सोयाबीन एकरी उत्पादन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ घेता येईल.

यासाठी जिल्हा आधिक्षक कृषी अधिकारीयांनी सोयाबीन लागवडी बाबत व शेतकऱ्यांनी कमी खर्चाच्या रासायनिक खताचा वापर कमी करून जमिनीमधील कार्ब व गरजे एवढेच खताचा वापर करण्याची गरज आहे आपण सोयाबीन साठी विशेषता बीबीएफ पट्टा पद्धत किंवा वाफे पद्धतीने.लागवड केल्यास बियाणाच खर्च कमी होऊन कमी बियाणामध्ये अधिक उत्पादन काढता येऊ शकते याबाबतचं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी प्रात्यक्षिक व माहिती पुस्तिकेद्वारा शेतकऱ्यांना दिली यावेळी कापूस उत्पादनाच्या बाबतीत कृषी तज्ञ श्री अमर शेट्टीवार यांनी कापूस बियाणे निवड प्रक्रिया लागवड पद्धती व त्यावर खत औषधी याचा वापर उत्कृष्ठ दर्जेदार उत्पादन घेण्याचे तात्रिक व खर्चात बचतीकरण्याचे सुत्र यावर मार्गदर्शन शेतकऱ्याने केले यावेळी या भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा व राजुरा हे दोन्ही तालुके महाकॉट योजनेअंतर्गत मा बाळासाहेब ठाकरे ग्राम परिवर्तन कापूस मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्यासाठी एक गाव एक वाण कापूस लागवडीकरिता कोरपणा तालुक्यातील वीस गावाची निवड करण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांनी कापूस लागवडीपासून शेतकरी कार्यशाळा चर्चासत्र व प्रक्रिया पद्धती याबाबतची माहिती देऊन शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ करणे व त्यामध्ये प्रक्रिया करून विक्री साखळी निर्माण करण्याकरिता कोरपणा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही संधी असल्याने व या भागात मोठ्या प्रमाणात जिनिंगप्रक्रिया उद्योगअसल्याने शेतकऱ्यांना प्रक्रिया करून विक्री संधी निर्माण होणार आहे व यामधून आर्थिक समृद्धी ही संधी प्राप्त होणार आहे यासाठी गाव पातळीवर शेतकऱ्यांनी शेतकरी गट व अस्तित्वात असलेल्या शेतकरी गटांनी एकत्र येऊन एक गाव एक वाण या निवड प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री ठाकूर यांनी केले.

 कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विस्तारपूर्वक खरीप हंगाम पूर्वतयारी व कापूस लागवडी बाबत नियोजन वाचन करून दाखविले सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आबिद अली यांनी जमिनीची नष्ट होत असलेली सुपीकता व जमिनीचे आरोग्य सामान्याची गरज तसेच बदलते हवामान वाढते तापमान पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज व्यक्त केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कापूस मूल्यवर्धन साखळीचे फायदे याविषयी माहिती दिली यावेळी आत्माचे भेडे जि.एस.टी कंपनीचे वावरे तालुका कृषी अधिकारी गावडे मॅडम जिवतीइत्यादीने मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी अनुदानावरील बियाणे करिता ऑनलाईन डीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी तसेच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या नवीन विकसित बी बियाणे व तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी तालुक्यातील मंडळ अधिकारी सुपरवायझर कृषी सहाय्यक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये