Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसंतराव नाईक विद्यालयचा दहावीचा उत्कृष्ट निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :- उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात ग्रामीण शिक्षण प्र/सारक मंडळ द्वारा संचलित वसंतराव नाईक विद्यालय चा दहावीचा निकाल ९२.४३ टक्के लागला.

यात विद्यालयातून प्रथम सुमेध बाबू कांबळे (८२.४० टक्के), द्वितीय क्रमांक गायत्री महादेव पिपलशेंडे (८२.२० टक्के) तृतीय क्रमांक तृप्ती रवींद्र गोडे (८१.२० टक्के) यांनी पटकवीला.

या परीक्षेत एकूण ११९ विद्यार्थी बसले होते.

त्यापैकी १२ प्राविण्य श्रेणीत,५७ प्रथम श्रेणीत,३५ द्वितीय श्रेणीत,६ पास श्रेणी, एकूण ११० विद्यार्थी उतीन झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे, सचिव भाऊराव कारेकर, संचालक मंडळ, मुख्याध्यापक पी बी बोंडे, पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये