Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आनंदवनातील दिव्यांग मुलांनी शतप्रतिशत निकालाची परंपरा कायम राखली

यावर्षी परीक्षेत बसणारे सर्व ३० दिव्यांग उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

 संधी निकेतन अंपगांची कर्मशाला,आनंदवन येथील सर्व ३० दिव्यांग विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत कर्मशाळेच्या शतप्रतिशत निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

        महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगांची कर्मशाला, आनंदवन येथे दिव्यांग व्यक्तिंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डाच्या खाजगी विद्यार्थी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नंबर फॉर्म) दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसविले जाते. सदर विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी सुविधेसह नियमित शिकवणी वर्ग ही घेतले जाते. यावर्षी १८ कर्णबधिर, ११ अंध व १ अस्थिव्यंग असे एकूण ३० दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यात श्रेया वामन पावडे या अंध विद्यार्थीनीने ७६..३३ टक्के गुण मिळवित प्रथम स्थान पटकावले तर दीपक चौधरी या मूकबधिर विद्यार्थ्याने ६७.३३ टक्के गुण मिळवित सदर प्रवर्गात प्रथम क्रमांक घेतला.

       व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांचे नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात बारावी परीक्षा समन्वयक प्रवीण ताठे, आशीष येटे, नितीन आवरी, रमेश पवार या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. परीक्षा व पूर्व तयारी करीता आनंद निकेतन महाविद्यालयांच्या उपप्राचार्या राधा सवाने, लोकमान्य विद्यालयाचे लाखे सर यांचे बहुमोल योगदान व मार्गदर्शन लाभले. सदर यशा करीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, मसेसचे विश्वस्त सुधाकर कडू , सदाशिव ताजने, माधव कवीश्वर आदी मान्यवरांसह आनंदवन वासियानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन केले, पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये