Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडकपुर्णा नदीपात्र व जलाशयातून 2200 ब्रास रेतीसाठा जप्त

जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

खडकपुर्ना नदीपात्र व जलाशयातून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतकीबाबत वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22व 23मे ला महसूल विभागाने धडक कारवाई करून 2200ब्रास अवैध रेतो साठा जप्त करण्यात आला आहे.

22मे ला मौजे डिग्रस बू येथील रस्ते मोडण्यासाठी प्रभारी उप विभागीय अधिकारी तथा तहसिलदार, सिंदखेड राजा प्रवीण धानोरकर यांच्या नेतत्वाखालील पथका सह गेले असता तेथे अवैध रेती साठा आढळून आला, अजून शोध घेतला असता इतर ठिकाणी सुद्धा रेती साठा आढळून आला, एकूण 500 ब्रास रेती साठा आढळून आल्यानंतर ग्रामपंचायत ला घरकुला साठी रेती उपलब्ध करून देण्यासाठी घरकुलाच्या लाभार्थी ची महिती मागविण्यात आली असता याबाबत कोणीही रेती ची मागणी न केल्यामुळे सदर रेतीसाठा चोरी जाण्याची शक्यता असल्यामुळे तेथे रेती घेण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांना याबाबत विचारणा केली असता काही व्यक्ती रेती घेण्यासाठी इच्छूक असल्याने त्यांना शासकीय दर 600रुपये व इतर शुल्क सह 500ब्रास रेती साठा शासकीय दराप्रमाणे रक्कम प्राप्त करून घेतल्यानंतर संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला, व सदर रेती साठा उचल करण्यासाठीं तीन दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर वाहतूक आढळून आल्यास अवैध रेती वाहतूक समजून कारवाई करण्यात येईल असे सुचित करण्यात आले आहे याप्रसंगी प्रभारी उप विभागीय अधिकारी प्रविण धानोरकर, देऊळगाव राजा येथील तहसिलदार श्रीमती वैशाली डोंगरजाळ, अंढेरा चे ठाणेदार विकास पाटील, किनगाव राजा चे ठाणेदार महेश भाले, सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगाव राजा येथील शाखा अभियंता, तलाठी निलेश जाधव, सतीश तायडे, मंडळ अधिकारी के बी इप्पर हजर होते.

23मे रोजी अवैध रेती वाहतूक व रेती साठा वर कारवाई करण्यासाठीं जिल्हाधिकारी किरण पाटील स्वतः सकाळीं 10 वाजता भर उन्हात डिग्रस बू , निमगाव वायाळ येथे पाई फिरून खडक पूर्णा नदी पात्र व टाकरखेड वायाळ येथील रेती डेपो ची पाहणी केली, अवैध पणे रेती उपसा करून केलेले रेती साठे जप्त करण्या बाबत सूचना देण्यात आल्या त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 1000ब्रास रेती साठा आढळून आल्यावर याबाबत ग्राम पंचायत ला घरकुल साठी रेती उपलब्ध करून देण्यासाठी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी मागविण्यात आली असता याबाबत कोणीही रेती ची मागणी केली न केल्यामुळे सदर रेती साठा चोरी जाण्याची शक्यता असल्यामुळे तेथे रेती घेण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांना याबाबत विचारणा केली असता काही व्यक्ती रेती घेण्यासाठी इच्छूक असल्याने त्यांना शासकीय दर 600रुपये व इतर शुल्क सह 1000ब्रास रेती साठा शासकीय दर प्रमाणे रक्कम प्राप्त करून घेतल्यानंतर संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला व सदर रेती साठा उचल करण्यासाठीं तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर वाहतूक आढळून आल्यास अवैध रेती वाहतूक समजून कारवाई करण्यात येईल असे सुचित केले.

तसेच ज्यांच्या शेतात रेती साठा आढळून आला त्यांना नोटीस बजावण्याच्या सुचना दिल्या, जिल्हाधिकारी यांनी स्थानिक नागरिक, तरुण व अवैध रेती व्यवसाय मध्ये असलेल्या नागरिकांना अवैध रेती उत्खनन, व वाहतुकीचा व्यवसाय न करता उत्कृष्ठ शेती व व्यवसाय चा मार्ग निवडावा असे आवाहन केले.

त्यानंतर दुपारी तीन वाजता मा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण धानोरकर, वैशाली डोंगरजाळ, विकास पाटील, महेश भाले, शाखा अभियंता, तलाठी निलेश जाधव, सतीश तायडे व मंडळ अधिकारी के बी ईप्पर यांनी मौजे नारायण खेड येथे धाड टाकली असता 700ब्रास रेती साठा आढळून आला,तो सुध्दा इच्छूक असलेल्या नागरिकांना शासकीय दर प्रमाणे देण्यात आला,

त्यानंतर जिल्हाधिकारी किरण पाटील, उप विभागीय अधिकारी प्रविण धानोरकर, उप विभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार वैशाली डोंगरजाळ,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी चींचखेड येथे भेट दिली असता अवैध उत्खनन करणाऱ्या बोटी आढळून आल्यास त्या नष्ट करण्याबाबत तसेच अवैध वाहतूक करणारे रस्ते खोदून बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच आवश्यकतेनुसार NDRF पथक व इतर मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे सुचित केले, तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना विना क्रमांक ची वाहने व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, खडक पूर्णा जलाशयात असलेल्या बोटी जाफराबाद मार्गे पळून गेल्यास जिल्हाधिकारी,जालना यांना माहिती देउन कारवाई करण्यात येईल असे सुचित करण्यात आले,

22 व 23मे रोजी एकूण 2200 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला असून पंचनामा करण्याची कार्यवाही अद्यापही सुरु आहे असे प्रभारी उप विभागीय अधिकारी प्रविण धानोरकर यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये