ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चरुर धारापुरे येथे ३२ रक्तदात्यांनी केले स्वच्छेने रक्तदान

तळमळीचे युवा समाज परिवर्तनाची जाणिव असलेले अमोल मुरलीधर दडमल व आदिवासी माना जमात संघटन व विद्यार्थी युवा संघटना चरुर धारापुरे यांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      तालुक्यातील चंदनखेडा ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या छोट्याशा चरुर धारापुरे गावातील युवा समाज परिवर्तनाची जाणिव असलेले अमोल मुरलीधर दडमल व आदिवासी माना जमात संघटन व विद्यार्थी युवा संघटना यांच्या पुढाकाराने अमोल दडमल यांच्या लग्नसमारंभ तथा स्वागतसमारंभ ची औचित्य साधून आज दिनांक २१ मे २०२४ ला. मानिका भवन येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन नयन जांभुळे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला अध्यक्ष दुर्गाताई केदार पोलिस पाटील.चरुर (धा),प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते, उपसरपंच्या भारती उरकांडे, ग्रामपंचायत सदस्या आषा नन्नावरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते,धर्माधास चौधरी, प्रकाश भरडे, नंदकिशोर जांभुळे, डॉ.हर्षल गणविर, डॉ.तुषार पायधान, डॉ.अमोल रामटेके, डॉ.आषिश कांबळे, डॉ, अभिषेक कुकडे, वाहनचालक रुपेश घुमे.यादी या उद्घाटनिय शिबिरास प्रामुख्याने उपस्थित होते. छोट्याशा चरुर गावातील चंदनखेडा परिसरातील ३२ रक्तदात्यांनी स्वच्छेने येवुन अतुल्य रक्तदान केले सर्व रक्तदांत्याना लगेच वर वधू व आदिवासी माना जमात संघटन व विद्यार्थी युवा संघटना चरुर धारापुरे यांच्या कडुन पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवुन सन्मान करण्यात आला.

यावेळी अरुणा चौधरी,निरंजना श्रिरामे, राहुल केदार,रुपेश केदार,अमर श्रिरामे, सचिन गजभे,समिर केदार, सौरभ दडमल, गायत्री श्रिरामे, पुजा गायकवाड,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा, बिरसा मुंडा क्रिडा मंडळ कोकेवाडा (मा) विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ व चरुर धारापुरे येथील ग्रामस्थांचे महत्वपूर्ण मोलाचे विशेष सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये