Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनता महाविद्यालयाचा बारावीचा उत्कृष्ठ निकाल

विज्ञान शाखेचा निकाल ९९.०४ टक्के ; कला शाखेचा निकाल ८० टक्के ; वाणिज्य शाखेचा निकाल ९०.७८ टक्के तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल ९५.८३ टक्के

चांदा ब्लास्ट

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा सत्र २०२३-२४ चा निकाल आज (दि. २१) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता कनिष्ठ महाविद्यालयाने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे.

     जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.०४% टक्के, कला शाखेचा निकाल ८०% ; वाणिज्य शाखेचा निकाल ९०.७८% तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल ९५.८३% इतका लागलेला आहे.

          महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून झोया खान (९३.३३%), कु. धनश्री शास्त्री (९२.००%), गुरनिश कौर जूनेजा (९१.८३%), कु. तन्वी चलाख (८९.६७%), सृष्टी आडवे (८८.३३%), स्नेहा गिरसावळे (८८.००%), खुशी अरवेलिवार (८७.६७%), सृष्टी देवांगन (८७.६७%), अहर्त निमगडे (८७.५०%), अर्पित भाकरे (८७.३३%), चिन्मय चाफले (८७.३३%), रोशन आवारी (८७.१७%), आर्यन गोमासे (८७.१७%), स्नेहजित अंबागडे (८६.८३%), तुषार चौधरी (८६.८३%), कु. पूर्वा पायपरे (८६.६७%), अनुष्का मल्लेलवार (८६.५०%), कु. प्रांजली इटकलकर (८६.३३%), माहिनुर माली (८५.६७%), शबीना अब्दुल शफी (८५.५०%) हे विद्यार्थी प्राविण्यप्राप्त आहेत.

   कला शाखेतून कु. तन्वी भागेवाड (६९.७०%), वंश चौधरी (६६.५०%), गणेश सोनुले, वाणिज्य शाखेतून प्रतीक सपरे (८९.६७%), प्रज्ञा बोढे (८८.६७%), धीरज राजूरकर (८५.८३%), एम.सी.व्ही.सी. शाखेतून सुशील टिपले (६३.५०%) हे विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त झालेले आहेत.

         प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य सौ. के.ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. के.सी.पाटिल, प्रा. व्ही.एस.बोढाले, डॉ. ए.के.महातळे, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. जी. बी. दरवी, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, डॉ. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये