ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉलस सर्च जुनियर कॉलेजचा १०० टक्के निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात सर्च फाऊंडेशनद्वारा संचालित स्कॉलस सर्च ज्युनियर कॉलेज कोरपनाचा १०० टक्के निकाल लागला.

यात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक फैसल मकसुद पारेख (७७.१७), द्वितीय क्रमांक अक्षता विश्वेश्वर गंगशेटीवार (७४.०० टक्के) तर तृतीय क्रमांक समीक्षा मनिराम कोडापे(७१.५० टक्के),चौथा क्रमांक क्रीष्णा रामेश्वर जाधव (७०.८३) पाचवा क्रमांक सायली दयाल जीवने (६८.५०) यांनी पटकाविला.

या परीक्षेत एकून १०८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक प्रावीण्य श्रेणी, ३९ प्रथम, ६८ उतीर्न श्रेणीत असे एकूण १०८ ही विद्यार्थी पास झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्च फाउंडेशनचे चैअरमन इंजी दिलीप झाडे, संचालक मंडळ, प्राचार्य राहुल उलमाले,सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये