गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : “बुद्धिस्ट समन्वय कृति समिती, मूल रोड, चंद्रपूर” यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा रविवारी, दिनांक १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता समितीच्या भव्य प्रांगणात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बुद्धप्रकाश वाघमारे (अध्यक्ष, बु.स. कु समिती, चंद्रपूर) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून बाबा मून (सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर), मिलिंद निमसरकर (विक्रीकर अधिकारी, नागपूर) तसेच जय भारत चौधरी (पी.एच.डी. एडिनबर्ग विद्यापीठ, स्कॉटलंड) यांची उपस्थिती लाभली. समितीच्या वतीने विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.