सुप्रसिद्ध भद्रनाग मंदिरात महाशिवरात्र यात्रा
हजारो भाविकांनी घेतले भद्रनाग स्वामींचे दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ऐतिहासिक भद्रावती शहराचे आद्य दैवत असलेल्या शहरातील सुप्रसिद्ध पुरातन भद्रनाग मंदिरात महाशिवरात्री यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत सहभागी होत हजारो भाविकांनी महाशिवरात्री निमीत्याने दर्शन घेतले. यात्रेनिमित्त मंदिरात विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले.
आज पहाटे पासुनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरु झाला.संपुर्ण विदर्भातून भावीक मंदिरात दर्शनासाठी आले.भाविकांचा उपवास लक्षात घेता भद्रनाग युथ फाउंडेशन तर्फे भाविकांना ऊपवासाच्या साबुदाणा खिचडीचे वितरण करण्यात आले.या स्टालचे उद्घाटन खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.या परीसरातील महादेवाला जाणारे भाविक महादेवावरुन परतल्यानंतर आधी भद्रनागाचे दर्शन घेतात व नंतरच आपल्या घरी जात असतात.
मंदिर प्रशासनातर्फे मंदिर परीसरात यात्रेचे योग्य नियोजन करण्यात आल्याने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाली. यात्रेत काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.