राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीच्या वतीने शनिवारी मूल येथे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा
सहभागी होण्याचे प्राचार्य डाँ. चंद्रमौली यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली : भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालीत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमानेे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अधिनस्त महाविद्यालयातील लिपीक, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयीन कर्मचारी वृंदाच्या उदबोधनाकरीता सुव्यवस्थापन व कौशल्य विकास एकदिवसीय कार्यशाळा शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी मूल येथील श्री माॅ दुर्गा मंदिराच्या सभागृहात आयोजीत करण्यांत आली आहे. आयोजीत कार्यशाळेचे उद्घाटन नागपूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. संतोष चव्हाण यांचे हस्ते होणार असून भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे अध्यक्ष संदीप गड्डमवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. अनिल हिरेखन यांचे बिजभाषण होणार असून संस्थेचे सचिव राजाबाळ संगीडवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दिवसभर चालणा-या आयोजीत कार्यशाळेत महाविद्यालयातील व्यवस्थापनात कार्यालयीन लिपीकांची कार्ये व जबाबदारी या विषयावर सहसंचालक कार्यालय नागपूर येथील प्रशासकिय अधिकारी शंकर बरगे मार्गदर्शन करणार असून प्रयोगशाळा सहायक आणि परिचर यांची महाविद्यालयाच्या हितासाठी भूमीका या विषयावर नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालय ब्रम्हपूरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. नामदेव कोकोडे उदबोधन करणार आहेत. ग्रंथालयाच्या सुयोग्य व्यवस्थापनात ग्रंथालय लिपीक व ग्रंथालय परिचर यांची भूमीका या विषयावर आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील ग्रंथपाल डाॅ. संजय साबळे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४ वाजता कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रमात संघटनेचे राज्य पदाधिकारी राजा बढे, एम.एस.कामठे, गोविंद जोशी, डाॅ. सुजीत सिंह, गजानन काळे आणि प्रशांत रंदई कर्मचा-यांच्या समस्येवर चर्चा करणार आहेत.
आयोजीत कार्यशाळेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदानी मोठया संख्येनी सहभागी व्हावे. अशी विनंती आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ए.चंद्रमौली, संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत खोके आणि अरूण जुनघरे यांनी संयुक्तरित्या केली आहे.