Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सैनिकी मुलां / मुलींच्या वसतिगृहात प्रवेशाची संधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नागपूर येथे माजी सैनिकी मुलांचे वसतीगृह क्षमता 60 व माजी सैनिकी मुलींचे वसतीगृह क्षमता 70 आहे. नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी सैनिक/माजी सैनिक पाल्यांना सवलतिच्या दरात व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे.

तरी ज्या आजी सैनिक/ माजी सैनिक/ माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी माजी सैनिकी मुलांचे-मुलींचे वसतीगृह, हिस्लॉप कॉलेज जवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर येथून रु. 50/- चा प्रवेश अर्जाचा फॉर्म व माहिती पुस्तिका घेऊन दिनांक 31 मे 2024 पर्यन्त माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेल्या संस्थेच्या दाखल्याची छायांकित प्रतिसह माजी सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृहात जमा करावे असे आवाहन मेजर (डॉ.) शिल्पा खरपकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नागपूर करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये