ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर पोलिसांनी लाखो रुपयांची विदेशी दारू पकडली

एकूण सात लाख सत्तर हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-पोलिसांना पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीर द्वारे माहिती मिळाली की एक पिकअप टाटा एस गाडी विदेशी दारू ने भरलेली सरळ बल्लारपूर ला न येता विसापूर गावा वरून बल्लारपूर ला येत आहे आणि छोटे दारू विक्रेता यांना विदेशी दारू सप्लाय करीत आहे अशी माहिती मिळाली असता पोलिसांनी विसापूर -बल्लारपूर मार्गांवर सापळा रचून टाटा एस पिकअप गाडीला अडवून झडती घेतली असता त्यात विदेशीदारूचे बॉक्स आढळून आले असता गाडीला पोलीस स्टेशनला आणून जप्ती कारवाई करण्यात आली. त्यात विदेशी दारू व बियर असे 48पेट्या अंदाजे किंमत तीन लाख सत्तर हजार रुपये चा माल व पिकअप गाडी अंदाजे की, चार लाख असे सात लाख सत्तर हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विदेशी दारू ने भरलेली गाडी पुराना बस स्टॅन्ड स्थित टिकले वाईन शॉप ची असल्याचे कळले. वाईन शॉप मेन रोड वर असल्याने दुकानातून छोटे दारू विक्रेता यांना देशी -विदेशी दारू सप्लाय करता येत नसल्याने अवैध मार्गाने गोडाऊन मधून माल आणता वेळेसच खेडे गावा मध्ये सप्लाय करीत असल्याची माहिती मिळाली होती. या अगोदर ही टिकले वाईन शॉप ची गाडी बल्लारपूर ला सरळ न येता विसापूर हुन येत असतांना विसापूर येथील शिवाजी चौक येथे दारू ने भरलेली गाडी पकडण्यात पोलिसांना यश आले होते.लाखोचा मुद्दे माल जप्त करण्यात आला होता ही दुसरी वेळ आहे. या दुकानाला चिल्लर विक्री ची परवानगी असून थोक विक्री करीत असल्याची पोलिसांना माहिती आहे छोटे दारू विक्रेता जादा दाम मध्ये विक्री करतात. छोटे दारू विक्रेता यांना विकण्या करिता दारूचं मिळाली नाही तर काय विकणार? पोलिसांची कारवाई मुळे छोटे दारू विक्रेता वर लगाम लावण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे राजुरा. यांचा मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, स, पो, निरीक्षक दीपक काक्रेटवार, पो ह, संतोष दंडेवार,सफौं गजानन डोईफोडे, पोहवा रणवीजय सिंग ठाकूर, आनंद परचाके, सुनील कामटकर,शेखर माथणकर इ, चमू ने कारवाई केली. पिकअप ड्राइवर संशयित आरोपीदीपक अरुण मामेडवार(37)रा,बाबुपेठ नेताजी चौक चंद्रपूर,वर कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये