ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे पक्षी संवर्धन कार्यक्रम साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारा माणसाच्या विकासाबरोबर पशु -पक्षी यांच्या सुरक्षेकरीता धडपड करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा परिषद शाळा मानोली येथे पक्षी संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमात एकूण ९० शालेतील मुलं, शिक्षक व गावकरी यांच्या द्वारे प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत पोस्टर्स, बॅनर्स व नारे यांच्या द्वारे पक्षी संवर्धनचा संदेश गावाकऱ्यांना देण्यात आला.

त्यानंतर अल्ट्राटेक,माणिकगड च्या सी. एस. आर. अंतर्गत मुलांना उन्हाळा चे दिवस लक्षात घेता मातीची भांडी वाटप करून त्यात पक्ष्याना पाणी व अन्न ठेवण्यासाठी प्रऊत्त करण्यात आले. तसेच मुलांची चित्रकला व कविता स्पर्धा पक्षी संवर्धनवर्ती घेण्यात आली. गांवतील वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष्याच्या पाण्यासाठी पाणिभरलेले भांडे ठेवण्यात आले.

या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक पवार सर, सहाय्यक शिक्षक सोयाम सर, पवार सर, मेश्राम व रायपुरे मॅडम तर अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस व गावकरी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल शिक्षक, विद्यार्थी व गावाकऱ्यांनी माणिकगढ चि मनसोक्त स्तुती केली.

 या उपक्रमाला यशस्वी करण्यास माणिकगडच्या सी. एस.आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये