ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदार जनजागृती अभियान शिक्षकच यशस्वी करू शकतात – नागो गाणार

म.रा.शिक्षक परिषदचे मतदार जनजागृती अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

‘आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असल्यामुळे सुजाण नागरिकांच्या मतांना महत्वाचे स्थान आहे. लोकशाही बळकट करण्याची उत्तम संधी म्हणजे मतदानाचा हक्क असून मतदान करण्याकरीता लोकांना प्रेरीत करणे आवश्यक आहे. मतदानाचा आकडा किमान 80 टक्के असलाच पाहिजे आणि याकरीता मतदानाला जा व आपला हक्क बजावा, असे सांगणारा वर्ग म्हणजे शिक्षकच आहे. शिक्षकांचा आपल्या परीसरात दांडगा संपर्क असल्यामुळे मतदार जनजागृती अभियान शिक्षकच यशस्वी करू शकतात, असे प्रतिपादन स्थानिक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ‘मतदार जनजागृती अभियाना’च्या विशेष बैठकीस मार्गदर्शन करताना माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी कामगार भवन येथे 22 एप्रिल रोजी केले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी म.रा.शि.प.चे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गुडधे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार नागो गाणार, नागपूर विभागाचे अध्यक्ष अजय वानखडे, विभागीय कार्यवाह सुभाष गोतमारे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रा. मोहन गुजरकर, हेमंत बेलखोडे, मनिषा साळवे, प्रा. रत्ना चौधरी, शुभांगी चिकटे, माधुरी खुळे, सुधीर राठोड, लता हेडाऊ, सतिश झाडे व प्रवीण गजभिये मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी म.रा. शि.प.च्या वतीने वर्धा लोकसभा मतदारसंघात शिक्षकांच्या भेटी घेऊन व त्यांच्या बैठकी घेऊन मतदार जनजागृती अभियान यशस्वी केल्याबद्दल शिक्षक परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. विभागीय अध्यक्ष अजय वानखेडे, कार्याध्यक्ष प्रा. मोहन गुजरकर, शुभांगी चिकटे, सुभाष गोतमारे यांनी बैठकीत आपले मार्गदर्शन केले.

संचालन जिल्ह्याचे कार्यवाह प्रदीप झलके तर आभार उपाध्यक्ष प्रमोद गुडधे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये