ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी मतदार संघात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व रोव्हर्स-रेंजर्स बनणार ‘मतदान बुथ स्वयंसेवक’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

लोकसभा निवडणुकीच्या दिवशी वृद्ध, अपंग व आजारी मतदारांना ‘मतदान केंद्रावर’ मतदान कक्षापर्यत पोहचविण्याची ‘स्वयंसेवक’ म्हणून सेवा पुरवण्याकरीता राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक व रोव्हर्स-रेंजर्स तत्पर राहणार आहेत. याकरीता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर
यांच्या मार्गदर्शनाखाली 40 मतदान केंद्रावर 40 स्वयंसेवक सेवा पुरवणार आहेत. यात देवळीच्या एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील रोव्हर्स-रेंजर्स व रासेयो स्वयंसेवक, वायगांव येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक व पुलगाव च्या ज्ञान भारती कनिष्ठ महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांचा सहभाग असून ते देवळी व देवळी परिसरातील गावांमध्ये तसेच पुलगाव, वायगांव व तळेगाव टालाटूले येथे सेवा पुरवणार आहेत.

आदर्श नाईक, कोमल शितळे, आदित्य तामगाडगे व साहील रामगडे यांच्या नेतृत्वात सदर रासेयो स्वयंसेवक व रोव्हर्स-रेंजर्स काम करणार आहेत.
सदर स्वयंसेवकांना सेवा कार्याकरीता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका पवार, तहसीलदार दत्तात्रय जाधव व नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी परवानगी देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये