ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत २९ व ३० ऑक्टोबरला श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन

बाल किर्तनकार भाविका खंडाळकर (दुरदर्शन कलाकार) यांचे समाज प्रबोधनपर जाहीर किर्तन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव दि. २९ रविवार व ३० सोमवार ऑक्टोबर२०२३ ला श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव समिती भद्रावतीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. अनिलभाऊ धानोरक (नगराध्यक्ष नगरपरिषद भद्रावती), मा. रमेशजी राजूरकर (निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र), मा. मुकेशभाऊ जिवतोडे ( शिवसेना (उ. बा. ठा.) चंद्रपूर जिल्हा प्रमुख), मा. संतोषभाऊ आमने (उपाध्यक्ष नगरपरिषद भद्रावती), मा. प्रफुल्लभाऊ चटकी (माजी. उप नगराध्यक्ष तथा नगरसेवक भद्रावती) यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

या दोन दिवस चालणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमात दि. २९ ला ७•०० ते १०•०० श्रीं ची घटस्थापना, पुजा व आरती पोथीचे पारायण (लक्ष्मणराव चौधरी यांच्या हस्ते), भजन,महिला व मुली करीत विविध स्पर्धा, गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार दि. ३० ऑक्टोबरला दुपारी ११. ०० ते २.०० वाजता पर्यंत (सप्त खंजरी वादक दुरदर्शन बाल कलाकार) कु. भाविका खंडाळा (साथ संगत नागपूर) यांचा समाज प्रबोधनपर जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नाभिक समाजाकडून दिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी नाभिक समाजातील भाविक बांधव, भगिनींनी श्री संत नगाजी महाराजांच्या शोभा यात्रेस सोमवार दिनांक ३० ऑक्टोंबरला सकाळी ८.०० ते ११ वाजेपर्यंत निघणाऱ्या शोभा यात्रेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आले आहे.

गोपाल काला वितरण, कार्यक्रमाच्या अंती महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी ५•०० ते ९•०० वाजेपर्यंत या सोबतच सायंकाळी ६•०० वाजता ( दिनेश म्युझिक) आर्केस्ट्राच्या कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नाभिक समाज, भाविक भक्तांनी होणाऱ्या पुण्यतिथी उत्सवास व वरील होणाऱ्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव समिती भद्रावतीचे आयोजक बंडु व्ही लांडगे (अध्यक्ष), हरीश शे. घुमे,पांडुरंग हणुमंते (उपाध्यक्ष), सचिन प्र. नक्षिणे (सचिव), (कोषाध्यक्ष) आशिष चौधरी,सतिश मांडवकर, (सहसचिव) सुरेश जमदाडे, सुधीर लांडगे, महिला अध्यक्षा सूरेखाताई अतकरे,कार्याध्यक्षा रागिणी सुत्रपवार, सचिव  मोनाताई जांभुळकर, उपाध्यक्ष प्रतिभाताई नक्षिणे, कोषाध्यक्ष भुवनेश्वरी निंबाळकर, सहसचिव मंजुताई मेश्राम यांचे कडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये