ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात महसूल कर्मचारी संघटने मार्फत बेमुदत कामबंद आंदोलन

महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या गोष्टीची दखल घेण्यात घ्यावी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 10/07/2024 रोजी पासून संपुर्ण महाराष्ट्र राज्याच्या तहसील कार्यालयात बेमुदत आंदोलन सुरू केलेले असुन महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस किशोर हटकर व अध्यक्ष जीवन आहेर यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना लिखीत पत्र पाठवले असून यामध्ये त्यांनी सांगितले की आमच्या मागण्या नंबर (१) महसूल विभागाच्या सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागु करण्यात यावा.(२) अव्वल कारकून /मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत. (३) महसूल विभागाच्या आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरती मुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे.(४) वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा.(५) महसूल सहाय्यकाचा ग्रेडपे १९०० वरून २४०० करण्यात यावा.(६) महसूल सहाय्यक व तलाठी यांना सेवा अंतर्गत एकसमान परिक्षा पध्दती लागु करण्यात याव्यात. (७) महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसूचना दिनांक ०३/०२/२०२३ नुसार तात्काळ अव्वल कारकून यांची वेतन निश्चिती करण्यात यावी.(८) महसूल सहाय्यकाची सेवा जेष्ठाता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी.(९) महसूल विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची सेवावृत्तीचे लेखाधिकारी वेतन पडताळणी पथका ऐवजी समकक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांचे वेतन पडताळणीचे अधिकारी मार्फत करण्यात यावी. (१०) अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे. (११) नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेड वेतन ४८०० करण्यात यावा. (१२) अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदलाबदली धोरणास नुसार पदस्थापना देण्यात यावी. (१३) नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून/ मंडळ अधिकारी यांच्या करीता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळसेवा याबाबत प्रमाणे ७०.१०.२० असे करण्यात यावे. (१४) चतुर्थ श्रेणी शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये २५ टक्के पदोन्नती देण्यात यावी. (१५) कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी डॉ दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा.

या मागणीकरीता वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण तहसील कार्यालयातील कर्मचारी यामधील गट क संवर्गातील अमोल उगेवार राजीव बादाड चेतन खंडारे दिनेश झोले तुषार शिंदे राखी जयस्वाल राहुल मोरे पुनम मडावी अभय पवनारकर अजय लाडेकर पुनम वाळूकर धीरज कांबळे अविनाश मानकर आत्माराम सांगळे मनोज वंजारी विवेक मलकापुरे योगिता गाडगे अर्चना जांभूळकर ममता मांडण श्वेता खराबे ज्योत्स्ना कुर्जेकार तेजस्विनी चरडे आशावरी चांदेकर प्रदिप ढेपे राजेश ढोक राणी वाघ मंगला गलोले कुसुम वाघ मिना वाघमारे राजेंद्र कंडे तुकाराम अढाऊ विजया तळवेकर स्वाती केंद्रे प्रगती चाफले पुनम मडावी सारीका हटवार रंजना तडस चेतना भारती लता लोंढे सारिका राऊत आरती नवघरे अनंत राऊत आदिनाथ कातकडे नितीन मेश्राम योगेश गडलिंग अतुल जाधव इत्यादी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये