Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी जागतिक दिनानिमित्त माजरी परिसरात मणिपूर घटनेचा तीव्र निषेध!

विविध स्तरावरील ग्रामीण परिसरातील अनेक गावे एकवटली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

हजारों युवक -युवती व महिलांचा सहभाग

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ सायंकाळच्या अंधारात विविध ग्रामीण स्तरावरून आगमन करीत आक्रोश रॅलीत प्रत्यक्षपणे सहभाग दर्शवत महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे असलेले निवेदन माजरी पोलीस ठाणेदार व प्रशासनाला सादर

९ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनानिमित्त आदिवासी समाज बांधवांनी यावर्षी सामाजिक सांस्कृतिक ,कलात्मक नृत्य या प्रकारचा सांस्कृतिक रचनात्मक कुठलाही प्रयोग ९ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनानिमित्त सादर न करता, राज्य, देश, प्रादेशिक विभाग, जिल्हा विभाग विविध पातळीवर सातत्याने आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय तत्वतः जल, जंगल ,जमीन बळकावण्याचा दृष्टिकोन बाळगून यासोबतच आदिवासी समाजातील व्यक्ती व महिलां, युवती व बालकांवर सातत्याने होणारे मानसिक आर्थिक, शारीरिक शोषण ,विटंबना, मानसीक हनन होईल. अशा अन्याय अत्याचारात्मक घटना घडवून आणणे. मणिपूर सारख्या मोठ्या प्रमाणात लांचनास्पद घटना व दंगली घडवून आणणे ह्या बाबी आदिवासी समाजाच्या दृष्टीने व राष्ट्रहिताच्या दृष्टीने गंभीर असून त्याची दखल आदिवासी जागतिक स्तरावरून होणे गरजेचे आहे . भारत देशात प्रथम स्थानी महामहीम राष्ट्रपती आदिवासी समाजातील महिला प्रामुख्याने प्रमुख पदी असून ,मनिपुर सारख्या घटना घटनांची योग्य दिशेने चौकशी होणे गरजेचे आहे .

घटना घडवून आणणाऱ्या व प्रत्यक्षात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्वांचीच उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे .अशा घटना घडूच नये यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते निर्भीड नेतृत्व राष्ट्रीय स्तरावरील’द “ट्रायबल पोस्ट मीडियाचे कार्यकारी संपादक, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी निघालेल्या आक्रोश रॅली ला संबोधित केले . आदिवासी समाज बांधव आक्रोश रॅलीचे नेतृत्व रॅलीचे सहयोजक माजीपंचायत समिती सदस्य ,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संघटन प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते चिंतामण आत्राम यांनी केले.

याप्रसंगी पळसगाव ,नागलोन ,पाटाळा माजरी विविध स्तरावरील ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य, आदिवासी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्य समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते . मणिपूर येथील गंभीर घटना लक्षात घेता त्या घटनेचा निषधात्मक बाब म्हणून उचित न्यायाच्या संदर्भात कुठल्याही स्तरावर आनंद उत्सव व गाजावाजा न करता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर रॅलीत हजारो आदिवासी समाज बांधवांचा सहभाग होता. सदर घटनेचा इतर विविध संघटनानी ही समर्थनार्थ आपल्या निषेधात्मक भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. प्रसंगी पोलीस स्टेशन माजरी ठाणेदार व पोलीस प्रशासनाकडे मणिपूर घटनेच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. ९ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनानिमित्त मणिपूर घटनेच्या संदर्भात निघालेल्या आक्रोशी रॅलीत विजय येळके, सोमदेव चांदेकर, विनोद कुंमरे मुरलीधर गेडाम, धनराज कुंमूरे ,दिगंबर शिडाम, सदानंद सिडाम, विशाल उईके, हंसराज आत्राम, कवडू गेडाम ,पुरुषोत्तम चांदेकर, अमित आत्राम, धनराज गेडाम ,मृणाल आत्राम ,कुणाल आत्राम, कैलाश परचाके, शुभम सोयाम, विनोद परचाके, मारुती कुळसंगे, मनोज परचाके ,कैलाश परचाके, विजय आत्राम, देविदास आत्राम ,हर्षल आत्राम ,जंगलु आत्राम ,सूर्यभान आत्राम ,विलास आत्राम, शाम मेश्राम, गंगाधर आत्राम ,देविदास आत्राम ,मारुती कुरसंगे शुभम सोयाम गोलू मडावी सचिन उत्तम उत्तम आत्राम, लक्ष्मण आत्राम, युवराज आत्राम, रोहित आत्राम ,सुरज परचाके राहुल परचाके, शरद सिडाम, अतुल परचाके ,रोशन परचाके, प्रकाश प्रकाश कन्नाके ,प्रवीण किनाके ,आकाश तोडासे, आचारी पडाल ,स्वप्निल साठे ,सचिन साठे ,बंटी साठे ग्रामपंचायत सदस्य मंगला आत्राम, शोभाताई सिडाम (महिला संघटक) मीराताई पेंदोर ,प्रेमिलाताई आत्राम (समाज संघटक) अर्चना मडावी, माया मडावी ,बेबी गेडाम ,विमल सीडाम ,शालिनी आत्राम ,विमल आत्राम आदीं प्रमुख कार्यकर्त्यांनी आक्रोश रॅलीमध्ये सहभाग दर्शवत अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये