ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर गुरुद्वारा येथे खालसा साजना दिवस निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कमिटी गुरुद्वारा साध संगत, गडचांदूर च्या वतीने खालसा साजणा दिवस निमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला,दरबार स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक चंदन सिंह,द्वितीय क्रमांक मन्मित सिंह यांनी पटकविला.

गुरुवानी कंठ स्पर्धेत प्रथम क्रमांक मनमित सिंह,याने तर द्वितीय क्रमांक अर्जुन सिंह याने पटकाविला.

गुरमत विचार स्पर्धेत प्रथम क्रमांक नांनकी कौर यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक अरिजित सिंह याने पटकाविला, सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

याप्रसंगी मंजिदर सिंह सुरा, भूपिंदर सिंह, महीप सिंह, हंसराज चौधरी, नामदेवराव येरणे, करण सिंह, इंदर सिंह, गुरुप्रित सिंह, ओंकार सिंह, उपस्थीत होते, कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन गोपाल सिंह, यांनी केले,या कार्यक्रमात पुरुष, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये