ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. पोलीस अधिक्षक वर्धा यांची हिंगणघाट व मा. अपर पोलीस अधिक्षक वर्धा यांची आर्वी येथे शांतता समितीची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 13/04/2024 रोजी मा. पोलीस अधिक्षक वर्धा यांची हिंगणघाट व मा. अपर पोलीस अधिक्षक वर्धा यांची आर्वी येथे शांतता समिती ची बैठक संपन्न झाली. हिंगणघाट येथील बैठकीमध्ये हिंगणघाट उपविभागातील शांतता समिती सदस्य व आयोजक आर्वी येथील बैठकीमध्ये आर्वी उपविभागातील शांताता समिती सदस्य व आयोजक हजर होते. लोकसभा निवडणुक शांततेत पार पाडण्या करिता तसेच आगामी येणारे सण उत्सव शांततेत पार पाडण्या करिता सदर दोन्ही बैठकामध्ये चर्चा करण्यात आली.

मा. श्री नूरुल हसन पोलीस अधिक्षक वर्धा यांनी हिंगणघाट येथील बैठकीमध्ये शांतता समिती सदस्यांशी चर्चा केली व आर्वी येथील बैठकीमध्ये शांतता समिती सदस्यांशी मा. श्री सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांनी चर्चा केली. दोन्ही बैठकामंध्ये येणारे सण उत्सव व लोकसभा निवडणुक याबाबत चर्चा झाली.

हिंगणघाट येथील बैठकीकरीता ठाणेदार हिगंणघाट व उपविभागातील शांताता समिती सदस्य व आयोजक हजर होते. व आर्वी येथील बैठकीकरीता श्री देवराव खंडेराव उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, उपविभागातील ठाणेदार व उपविभागातील शांताता समिती सदस्य व आयोजक हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये