ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पॅंथर चौक, शांतीनगर परिसर, आर्वी नाका परिसर मार्गे तीन टप्प्यांमध्ये पथसंचलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 13/04/2024 रोजी पोलीस रामनगर कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीरामनवमी व आगामी लोकसभा निवडणूक संबंधाने पोलीस स्टेशन रामनगर येथील मुख्य मार्गावरून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा उपविभाग श्री प्रमोद मकेश्वर साहेब यांचे मार्गदर्शनात पोलिस दल, सी.आय.एस.एफ. व होमगार्ड सैनिक यांचे संयुक्त, पथसंचलन काढण्यात आले.

पथसंचलनामध्येे 01 सहाय्यक पोलिस निरीक्षक,08 पो.उपनिरीक्षक,25 पोलीस अंमलदार महीला व पुरुष, 66 सी.आय.एस.एफ जवान तसेच 15 होमगार्ड सैनिक व तिन पोलिस वाहने समाविष्ट झाली होती. सदरचे पथसंचलन पॅंथर चौक, शांतीनगर परिसर, आर्वी नाका परिसर मार्गे तीन टप्प्यांमध्ये पथसंचलन करण्यात आले. शांतता राहली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये