ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ त्या पाचही महान स्त्रीयांची संयुक्त जयंती साजरी

प्रत्येक विहारात अभ्यासिका तयार करा - अविनाश मेश्राम ठाणेदार मुल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

जयभीम महिला संघटन, भद्रावती यांनी डॉ. आंबेडकर चौक, भद्रावती येथे त्यागमुर्ती माता रमाई, पहिल्या मुस्लिम शिक्षीका फातिमा शेख, स्वराज्य जननी माँ जिजाऊ, स्त्री मुक्तीच्या अग्रणी माता सावित्रीबाई फुले आणि राणी अहिल्याबाई होळकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कविता मडावी, सामाजिक कार्यकर्त्या, प्रमुख अतिथी नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, मार्गदर्शक म्हणून अविनाश मेश्राम, ठाणेदार, पोलीस ठाणे, मुल आणि प्रा. संजय बोधे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरवात अश्विनी डांस ग्रुप, डिफेन्स यांच्या कडून सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, जिजाऊ, फातिमा शेख आणि अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर नृत्य, गायनाच्या सुंदर सादरीकरणातून मानवंदना देऊन करण्यात आली. तर रेणुका साने ग्रुप कडून स्वागत गीताणे कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी महीलांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध, अवैध धंदे यावर आवाज उठवा, यात मी तुमच्या नेहमी सोबत आहे असे आश्वासन दिले. समाजासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन मुलचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांचा जयभीम महिला संघटन कडून शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रत्येक बौद्ध विहारात अभ्यासिका तयार करा. ज्यातून मुले अभ्यास करून मोठे अधिकारी बनतील, नाहीच बनले तर त्यांची बुद्धी समाज उपयोगी कामात येईल असे वक्तव्य अविनाश मेश्राम यांनी बौद्ध समाजबांधवांना कार्यक्रमाच्या माध्यमातून केले. अविनाश मेश्राम यांनी सुंदर कवितेतून रमाई आंबेडकर यांचा अखेरच्या घटकेची कहानी, बाबासाहेब आंबेडकर सोबतचे क्षण अतिशय सुंदर आणि हळव्या मनाने मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कविता मडावी यांनी महिलांवर होणारे अत्याचार, महिलांचे आरक्षण आणि सध्याचे लोकतंत्र यावर प्रखरपणे आपले मत मांडले.

सध्याच्या राजकारणात महिलांचे स्थान यावर बोलतांना सरकारवर ताशेरे ओढले. महिला सक्षमीकरणासाठी अनेक विषयावर त्यांनी आपले विचार अतिशय निर्भिडपणे उपस्थित जनतेसमोर मांडले. या कार्यक्रमाला नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.

भद्रावती झालेला हा पहिला संयुक्त जयंती कार्यक्रम होता. तो जयभीम महिला संघटन ने अतिशय सुंदर पणे पार पाडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांसाठी मसालेभाताची व्यवस्था संघटनेकडून करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण जयभीम महिला संघटन भद्रावती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये