ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वच्छता राखणे हा स्वावलंबनाचा एक भाग, तिला सवय बनवावी – डॉ. अशोक जीवतोडे

‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाडा अंतर्गत स्वच्छ्ता अभियान संपन्न

चांदा ब्लास्ट

स्वच्छता राखणे हा मनुष्याच्या अंगी असलेला सद्गुण आहे. दैनंदिन स्वभावात हो आणला तर स्वावलंबनाचा एक भाग बनून जातो, वर्षभरच नियमितपणे आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखली जावी, नवीन पिढीने स्वच्छता ही सवय बनवावी, असे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती नीमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाडा अंतर्गत देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी, यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. सदर अभियान आज रविवार (दि.०१) ला स्थानिक नागपूर महामार्गावर सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान चालले. डॉ. अशोक जीवतोडे यांचे सोबत करण्यात आलेल्या सदर स्वच्छ्ता अभियाना दरम्यान श्रमदान करून सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात आला व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात, शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख-एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे, हे विशेष.

यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांचे सह दादा दहेकर, मनोहर गाठे, सचिन दिघाडे, प्रवीण दिघाडे, नितीन कुकडे, प्रकाश गाठे, शामराव बदकुलवार, मधुकर हिरादेवे, शाहू, सतीश बिजेवार, गोपाळ वाटेकर, अनिल काळे, प्रवीण साखरकर, डॉ. आशीष महातळे, रवि देवाळकर, किशोर ठाकरे, रविकांत वरारकर, रवि जोगी, महेश यार्दी, मंजुळा डूडूरे, संदीप कासवटे, जितेंद्र केराम, आदी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये