ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवकांच्या मनात चाललंय काय ?चर्चासत्र स्पर्धेला आली रंगत

जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त समाजकार्य महाविद्यालयात आयोजन

चांदा ब्लास्ट

      संपूर्ण देशात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह साजरा केला जात आहे.

      नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) आणि जनता महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत चांदा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकभाऊ जिवतोडे आणि जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष आणि एस.आर.एम. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयश्री कापसे गावंडे, नेहरू युवा केंद्र, जिल्हा युवा अधिकारी शमशेर सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली जनता महाविद्यालय, चंद्रपूर (राष्ट्रीय सेवा योजना विभाग), स्व. सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली, चंद्रपूर, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर याच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह उत्सव चे आयोजन 12 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आले आहे.

         13 जानेवारी रोजी स्वर्गीय सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर येथे युवकांच्या मनात चाललंय काय ? या विषयावर चर्चासत्र स्पर्धा रंगतदार अशी आचार विचारांची चर्चा पार पडली.

     स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून खेड्यापाड्यातील आणि महाविद्यालयातील युवा व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

     या युवा सप्ताह निमित्त चर्चासत्र माध्यमातून नेमके युवकांच्या मनात काय चाललंय ? युवक कसे विचार करतात. त्यांचे मत काय ? गाव, समाज आणि राष्ट्र विषयी युवकांमध्ये जाणीव निर्माण व्हावी. या उद्देशाने स्वामी विवेकानंद यांचे विचार मनामध्ये साठवून भावी आदर्श पिढी निर्माण करण्याचा हा उद्देश्य आहे.

    पाच – पाच युवकांची टीम बनवण्यात आली. यानंतर ग्रूप मधील एका एकाला बोलण्याची संधी दिली गेली. सर्व ग्रूप ने आपली मते मांडून झाल्यानंतर लेखक व कवी अविनाश पोइनकर आणि प्राध्यापक नितीन रामटेके दोन्ही परीक्षकांनी आपले मत युवकांनी व्यक्त केलेल्या विचारावर मांडले. यावेळी अविनाश पोइनकर म्हणाले की जसे वक्तृत्व, वादविवाद आणि इतर स्पर्धा घेतो तसच अशी चर्चासत्र स्पर्धा घेणे सुद्धा आज काळाची गरज आहे. शेवटी कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयश्री कापसे गावंडे यांनी एकंदरीत सर्व चर्चेचा निष्कर्ष मांडला व आपले मनोगत व्यात करत असताना 12 वी फेल या चित्रपटाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, जसा तो अधिकारी मनोज शर्मा ला सांगतो की “चिटिंग छोडनी होगी” तर आपल्या जीवनात पण आपण जीवन जगताना सर्वच प्रकारची चिटिंग सोडायला हवी तरच आपण जीवनात यशस्वी होऊ. अशा चर्चासत्र मुळे युवकांची विवेकबुद्धी जागृत होते व युवक तर्कबुद्धीने विचार करायला लागतात.

    विशेष अतिथी ॲड. देवा पाचभाई (विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र), निकिलेश चामरे युथ लीडर नेहरू युवा केंद्र, डॉ. प्राध्यापक मनुरे यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिलेश चामरे यांनी केले.

      कार्यक्रमाचे संचालन कु. स्वप्नील मेश्राम यांनी केले. दीपक श्रीरामे, समोर नंदुरकर, यांनी मोलाचे परिश्रम घेऊन सहकार्य केले. सर्वांचे आभार प्राध्यापक डॉ. मनुरे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये