ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक दिनानिमित्त सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात स्वयशासन उपक्रम उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे विविध शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयात इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयशासन दिन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारत आपापल्या वर्गातील सहाध्यायी विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या तासिका घेऊन अध्यापन कार्य केले. विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, अध्यापन कौशल्य, नेतृत्वगुण, आत्मविश्वास व जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तासिका प्रभावीपणे पार पाडल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक कार्याचा, विचारांचा व देशाच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेण्यात आला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.यावेळी प्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक, उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये