ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील भोक्सापूर, शंकरपठार, चिलाटीगुडा या गावात बांधकाम विभाग पंचायत समिती जिवती च्या वतीने नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू असून या अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. बांधकामात मातीमिश्रीत रेती सर्रासपणे वापरण्यात येत आहे. सिमेंट हलक्या दर्जाचे आणि कमी प्रमाणात वापरले जात असून लोहा नियमानुसार वापरला जात नसून बांधकामांवर पाणी टाकण्यात येत नसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. या तीनही नवीन अंगणवाडी इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची तक्रार मनसेचे तालुकाध्यक्ष हकानी शेख यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्या कडे केली असून.,

संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि त्याचा परवाना काळ्यायादीत समाविष्ट करण्यात करावा व संबंधित अभियंत्यावर विभागीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. व तत्काळ चौकशी करून कारवाई झाली नाही तर मनसेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तक्रारीतून दिला आहे. संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांनी तक्रारीची दखल घेऊन कनिष्ठ अभियंता उरकुडे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये