ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाची दारुबंदी कायद्यान्वये धडक कारवाई

एकुण 3 लाख 11 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दि 22.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलीस स्टाफ, चेतन पिसे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की मौजा सावली वाघ येथील बाबा मुकींदराव मन्ने वय 67 वर्ष हे त्यांचे ताब्यातील बैल बंडीने देशी दारूची सावली वाघ कडुन सेलु मुर्फाड कडे वाहतुक करीत येणार आहे अशा माहीती वरून मा.भा .पो. से. परीवेक्षाधिन वृष्टी जैन मँडम (ठाणेदार पो स्टे हिंगणघाट) याचे निर्देशाप्रमाणे वरील पोलीस स्टाफ व पंचनाम्यातील पंच यांनी नाकेबंदी करून प्रो-रेड केला असता आरोपी बाबा मन्ने याने त्याचे बैल बंडीने देशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपी बाबा मन्ने याचे ताब्यामधुन एकुन 17 देशी दारूने भरून असलेल्या खर्ड्याचे खोक्यात 90 एम एल च्या एकुण 1700 प्लास्टीकच्या शिश्या, बंडी, व मोबाईल असा एकुण 1,86,000/रू चा मुद्दे माल मिळुण आल्याने त्यास सदर मालाबाबात विचारणा केली असता सदर दारूचा माल हा त्यांचा मुलगा आरोपी क्र 2) प्रकाश उर्फ गोलु बाबाराव मन्ने रा. सावली वाघ याचा असुन त्याचे सांगण्यावरुनच दारूची वाहतुक करीत असल्याचे सांगीतल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पो. स्टे. हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

       तसेच दुस-या कारवाई मध्ये नमुद पोलीस स्टाफ यांना मिळालेल्या माहीती वरून मा. भा. पो. से. परीवेक्षाधिन वृष्टी जैन मँडम (ठाणेदार पो स्टे हिंगणघाट) यांचे निर्देशाप्रमाणे नाकेबंदी करून पो. स्टाफ चेतन पिसे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांनी पंचासह प्रो रेड केला असता आरोपी 1)नितेश लक्ष्मण गेडाम वय 23 वर्ष रा. महात्मा फुले वार्ड, 2) वि. सं. बालक यांचे ताब्यामधुन 12 प्लास्टीकच्या पन्नीमध्ये एकुण 150 लिटर गांवठी मोहा दारू व मोटर सायकल 220 पल्सर क्र एम एच 49 एन 8730 असा एकुण 125000/रू चा माल मिळुण आल्याने सदर मालाबाबात आरोपींना विचारणा केली असता सदर दारूचा माल हा आकाश उर्फ लल्ला शिंदे रा.संत चोखोबा वार्ड हिंगणघाठ याचा असल्याचे सांगीतल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द व वि सं बालक विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला

        अश्या एकुण दोन्ही कारवाई मध्ये एकुण 3,11,000/रू चा मुददेमाल माल जप्त करण्यात आला.

          सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री नरूल हसन सा.मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात भा पो से वृष्टी जैन मँडम (ठाणेदार पो स्टे हिंगणघाट) याचे निर्देशाप्रमाणे, पोलीस स्टाफ, चेतन पिसे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये