ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        येथील बस स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने बस स्थानक परिसरात प्रवाशांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची नियोजन करणे अत्यावश्यक होते. मात्र याकडे महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने तात्काळ बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आगार प्रमुखांना देण्यात आला आहे.

     राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा बस स्थानकात प्रवाशांसाठी मागील अनेक महिन्यापासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो नागरिक रोज शहरात येतात. यामुळे बस स्थानक परिसरात दिवसभर प्रचंड गर्दी असते. मात्र बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. प्रवाशांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवी लागते. अथवा पाण्यासाठी बस स्थानकातील उपहारगृहाचा आधार घ्यावा लागतो. ही परिस्थिती अनेक महिन्यापासून सुरू आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने बस स्थानक परिसरात प्रवाशांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक होते. मात्र या महत्त्वाच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशांना बस स्थानकात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी प्रवाशांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागावी लागते.

बस स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी बनवलेली टाकी ही फक्त शोभेची वस्तू बनली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने तात्काळ बस स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,सचिव जहीर पठाण, शहराध्यक्ष विजय खांडेभराड,आजमत खान,शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, अमोल उदयपूरकर,असलम खान, सचिन कोल्हे, शे. समीर,भानुदास कणखर,रावसाहेब गाडवे आदींनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये