ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गतिशील विकास, सर्वसामान्यांचा विश्‍वास हेच ध्येय – सुधीर मुनगंटीवार

वणी येथे भाजपच्या बुथ आणि शक्ती केंद्र प्रमुखांशी संवाद काँग्रेसच्या फसव्या प्रचारापासून मतदारांना सावध करा

चांदा ब्लास्ट

भाजपाच्‍या तिकीटावर विधानसभेसाठी 16 मार्च 1995 ला जेव्‍हा पहिल्‍यांदा निवडून आलो तेव्‍हाही जनतेची सेवा हेच लक्ष्‍य होते, आज विश्‍वगौरव व राष्‍ट्रभक्‍त देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्‍या आग्रहावरून लोकसभा निवडणुकीमध्‍ये जनतेची सेवा करण्‍यासाठीच उभा आहे तेव्हा गतिशील विकास आणि जनतेचा विश्वास हेच ध्येय आहे असे प्रतिपादन राज्‍यांचे वने, सांस्‍कृतिक कार्य मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा झाल्‍यानंतर मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वणी येथे आयोजित बुथ कार्यकर्ता व शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला मंगळवारी संबोधित केले. उमेदवारी जाहीर झाल्‍यानंतर मुंबईहून चंद्रपूरला परतल्‍यावर कार्यकर्त्‍यांनी केलेल्‍या स्‍वागताने मी भारावून गेलो, असेही ना. मुनगंटीवार म्‍हणाले. वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालयात आयोजित या संमेलनाला वणी विधानसभेतील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते, आघाडी प्रमुख उपस्थित होते.

कॉंग्रेस पक्षाच्‍या कार्यप्रणालीवर टिका करताना ना. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, कॉंग्रेस हा पक्ष देशभक्‍तीच्‍या रुपात आलेला ‘ मायावी राक्षस ’ असून सोशल म‍िडीयाच्‍या माध्‍यमातून मतदारांना प्रलोभने दाखवण्‍यासही तो कमी करणार नाही. कॉग्रेसच्‍या काळातच निवडणुकांमध्‍ये ईव्‍हीएम मशीन पहिल्‍यांदा वापरली गेली होती, हे कॉंग्रेस विसरले असल्‍याचे सांगत त्‍यांनी कॉंग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी निवडून एनडीएचाच उमेदवार येईल आणि एकदा निवडून आल्‍यानंतर कॉंग्रेसच्‍या वाट्याला हा मतदारसंघ जाऊ देणार नाही, असे ठाम मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

निवडणूक जिंकण्‍यासाठी बुथ कार्यकर्त्‍यांचा वाटा महत्‍वाचा असून त्‍यांनी मा. श्री. मोदी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहाचवावे, त्‍यांच्‍या मनात विश्‍वास निर्माण करावा, शेतकरी व महिला हितासाठी कार्य करावे, असे आवाहन बुथ कार्यकर्त्‍यांना उद्देशून मा. श्री. मुनगंटीवार यांनी केले.यावेळी आ. संजीव रेड्डी बोदकुलवार, आ. मदन येरावार, आ. अशोक उईके, संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोरडे, रवी बेलुरकर,राजेंद्र महाडोळे, राम लाखीया आदी भाजपा नेते मंचावर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये