ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

८५ वर्षांपेक्षा जास्त व दिव्यांग मतदारांना आता गृह मतदानाची सोय

१२ डी नमुन्याचे घरपोच वाटप सुरू

चांदा ब्लास्ट

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ८५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या १२ डी नमुन्याचे वाटप सुरू झाले असून सदर नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

८५ वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना १२ डी केंद्र अधिका-यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

८५ व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार : १३ – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण १६६२१ मतदारांचे वय ८५ किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यात पुरुष मतदारांची संख्या ७११७ तर स्त्री मतदारांची संख्या ९५०४ आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात असे एकूण मतदार २७५४ (पुरुष – ११६३, स्त्री – १५९१), चंद्रपूर मतदार संघात २३८० (पुरुष – ११००, स्त्री – १२८०),  बल्लारपूर मतदार संघात २२४६ (पुरुष –८९२, स्त्री – १३५४), वरोरा मतदार संघात २८७८ (पुरुष – १३५६, स्त्री – १५२२), वणी मतदार संघात २८४६ (पुरुष – १२२५, स्त्री – १६२१, आणि आर्णी विधानसभा मतदार संघात ३५१७ (पुरुष – १३८१, स्त्री – २१३६) मतदारांचे वय ८५ किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात ८५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या २४०३ (पुरुष – ९२१, स्त्री – १४८२) आणि चिमूर मतदार संघात २५९४ (पुरुष – ९९६, स्त्री – १५९८) मतदार आहेत.

असे आहेत दिव्यांग मतदार : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या ९६७९ आहे. यात ६१६४ पुरुष तर ३५१५ स्त्री मतदारांचा समावेश आहे. यापैकी राजुरा मतदार संघात १२३३ दिव्यांग मतदार (पुरुष –७८१, स्त्री – ४५२), चंद्रपूर मतदार संघात ९१३ दिव्यांग मतदार (पुरुष – ५९१, स्त्री – ३२२), बल्लारपूर मतदार संघात १८४२ दिव्यांग मतदार (पुरुष – ११९५, स्त्री – ६४७), वरोरा मतदार संघात १५५१ दिव्यांग मतदार (पुरुष – १०२१, स्त्री – ५३०), वणी मतदार संघात १६७९ दिव्यांग मतदार (पुरुष – १०३५, स्त्री – ६४४), आर्णी मतदार संघात २४६१ दिव्यांग मतदार (पुरुष – १५४१, स्त्री – ९२०) आहेत.

तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांची संख्या ११३८ (पुरुष – ७७४, स्त्री – ३६४) आणि चिमूर मतदार संघात १०९६ (पुरुष – ६८१, स्त्री – ४१५) मतदार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये