ताज्या घडामोडी

जंगल परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड

जंगल परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड 3 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट :———————————————

अतुल कोल्हे भद्रावती :-
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरू असलेल्या जंगल परिसरातील जुगारावर अड्ड्यावर धाड टाकीत जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई ही भद्रावती पोलिसांना बरांज तांडा जंगल परिसरातील जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाही केली असता कारवाईत चार मोटरसायकल व नगद 30,000 रकमेसह एकूण तीन लाख 12 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेल्या या पाच आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून त्यांना सोडण्यात आले. बरांज तांडा जंगलपरिसरातील जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करीत घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे पाच व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून नगदी रोख रुपया सहित मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात , अनुप आष्टणकर , शशांक बद्दमवार,
विश्वनाथ चुदरी , निकेश ढेंगे, जगदीश झाडे आदींनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये