ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलफैलमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला वर्धा पोलिसांनी घेतले ताब्यात

संपुर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 फिर्यादी नामे सौ.शिल्पा प्रज्वल चचाणे वय 25 वर्षे राहणार पुलफैल वर्धा हिने पोलिस स्टेशन वर्धा शहर ईथे येवून तक्रार दिली की मी दिनांक 9 मार्च 2024 रोजी रात्री दरम्यान आईकडे झोपायला गेली असता रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घराची कडी उघडून आत प्रवेश करून कपाट उघडून त्यात ठेवून असलेली पिशवी ज्यात फिर्यादी चे 2,140 ग्रॅम सोन्याचे डोरले 03 मणी व काळ्या मण्यात वळलेली पोत किंमत 12,000/- रुपये व 2) नगदी 3,500/- रुपये असा एकुण जु.की.15,500/- रुपयाचा मुद्देमाल असलेली पिशवी चोरुन नेली आहे.

फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध दिनांक 16/03/2024 रोजी अप क्र. 430/2024 कलम 457, 380 भा.दं.वि चा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला सदर गुन्ह्याचे समांतर तपासात गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीवरुन आरोपी नयन राजेश निंबाळकर वय 20 वर्षे रा. आनंद नगर,वर्धा यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरी गेलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलीसांची दिशाभुल केली परंतु त्यास सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे घराचे मागील बाजुस एका फरशीच्या खाली एक निळसर हिरव्या रंगाची थैलीत चोरीस केलेला मुद्देमाल एक मंगळसुत्र व नगदी 2,500/- रुपये काढुन दिल्याने सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास गुन्हे प्रगटीकरण पथक प्रमुख पो.हवा सुहास चांदोरे हे करीत आहे सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री नरूल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक श्री डॉ सागर कुमार कवडे,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.प्रमोद मकेश्वर,पोलीस निरीक्षक श्री.पराग पोटे पोलिस स्टेशन वर्धा शहर सहायक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी यांच्या मार्गदशनात गुन्हे प्रगटीकरण पथक प्रमुख पो.हवा सुहास चांदोरे, पोलीस अमलदार मनोज काकपुरे,जिवन आडे, नवनीत वानखेडे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये