ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून बहुप्रतिक्षित नंदीग्राम एक्सप्रेस उद्यापासून सुरु

बल्हारशाह येथे हंसराज अहीर दाखविणार ट्रेनला हिरवी झेंडी

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सतत प्रयत्नामुळे व मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या सहकार्याने  ट्रेन नं. ११४०१/११४०२ नंदीग्राम एक्सप्रेस(मुंबई-आदिलाबाद) चा विस्तार बल्हारशाह स्थानकापर्यंत करण्यात आला असून ही एक्सप्रेस दि १६ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.३० वा. बल्हारशाह येथून मुंबई करीता रवाना होत असून या गाडीचा शुभारंभ हंसराज अहीर यांचे शुभहस्ते होणार असून ते या गाडीस हिरवी झेंडी दाखवून गाडीस रवाना करणार आहे.

नंदीग्राम एक्सप्रेस चा विस्तार बल्हारशाह पर्यंत झाला असल्याने मराठवाडा परिसरातील विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील शिख बांधवांना त्यांचे पवित्र तिर्थस्थान असलेल्या नांदेड येथील गुरुद्वाराचे दर्शन करण्यास मोठी सुविधा मिळाली आहे तसेच मराठवाड्यातील हजारो महाकाली मातेच्या भक्तांना या रेल्वेगाडीमुळे येण्या-जाण्याची सोय झाली आहे.

सदर नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारपूर, चंद्रपूर, भांदक, वणी, पिंपळखुटी, आदिलाबाद, मुदखेड, नांदेड, परभणी, पूर्णा, औरंगाबाद, जालना, मनमाड ते मुंबईस(छ. शिवाजी महाराज टर्मिनस) जात असल्याने चंद्रपूर, वणी(यवतमाळ) व परिसरातील प्रवाशांना मुंबईला जाण्याकरीता फार मोठी सोय होणार आहे. सदर ट्रेन   (विशेष ०१००२) दि १६ मार्च रोजी सकाळी ८.३० वा बल्हारशाह येथून सुटणार असून १७ मार्चला सकाळी ५.३० वा. मुंबईला पोहचेल. या ट्रेनचे शुभारंभाचे दिवशी अग्रीम आरक्षण होणार नसून दि. १७ मार्च पासून दररोज अग्रीम आरक्षण सुरु होईल जे यात्री दि. १६ मार्चला या ट्रेन ने मुंबई व अन्य ठिकाणी प्रवास करतील त्यांना टि.टि.ई. तिकीट उपलब्ध करतील.

नंदीग्राम एक्सप्रेसच्या शुभारंभ व स्वागत समारंभास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, रेल्वे यात्री संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरीक व प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रेल्वे गाडीचे स्वागत करावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये