ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत नगर परिषद वर्धा द्वारे जागतिक महिला दिन साजरा  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 नगर परिषद वर्धा तर्फ मुख्यमंञी महिला सशक्तीकरण DAN-NULMअभियान अंतर्गत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मा.मुख्याधिकारी राजेश भगत साहेब यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक : ११ मार्च ला बचत गटाच्या महिलांची रांगोळी स्पर्धा व १२ मार्च विकास भवन वर्धा येथे महिलांचे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमाच्या क्रांती शहर संघाच्या अध्यक्षा शारदा झांबरे,प्रमुख वक्ता अँड अनिता ठाकरे,महिला व बाल कल्यान समिती सदस्य,डॉ. प्रिती जोशी स्ञी मुक्ती संघटना,डॉ. विशाखा बिदेलकर वैद्यकिय अधिकारी प्रार्थमिक आरोग्य केंद्र (वायगाव निपाणी)डॉ रक्षंदा थुल वैद्यकिय अधिकारी प्रार्थमिक आरोग्य केंद्र (हमदापुर)सेलु.,मा उपमुख्याधिकारी अभिजीत मोटघरे न प वर्धा, यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.सुरवातीला क्रांतीज्योती साविञीबाई फुले व मॉ जिजाऊ यांच्या फोटो ला पुप्प हार घालुन दिप प्रज्वलित करण्यात आले.

सर्व पाहुण्यांचे पुष्प गुछ देवुन स्वागत करण्यात आले. अँड अनिता ठाकरे यांनी कायदे विषयी,महिलांवर होत असलेल्या अन्याया अत्याचार विषयी,कौटुबिक वाद लहान किंवा घरघुती हे आपण महिलांनी थोडक्यात मिटवण्याच प्रयत्न करावा जेने करुन वाद विकोपाला जाणार नाही यावर महत्व पुर्ण मार्गदर्शन केले.

प्रिती जोशी यांनी कचरा व्यवथापन व विलगीकरण तसेच सुखा कचरा व ओला कचरा यावर मार्गदर्शन केले. डॉक्टर विशाखा बिदेलकर यांनी महिलांनी काळजी घेणे आजच्या काळात किती महत्वाचे आहे हे महिलांना समजावुन सांगीतले.लहान बाळ याची संगोपणा करण्या विषयी महत्वाचे मार्गदर्शन केले.डॉ रक्षंदा थुल यांनी महिलांनी आपले आरोग्य कसे निरोगी राहील,आहार कश्या प्रकारे घ्यावा ,शरीराची निगा कशी राखली पाहिजे,लहान मुलांना मोबाईल पासुन दुर ठेवले पाहिजे कारण लहान मुलांच्या डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात दुश परिणाम होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा शारदा झांबरे यांनी बचत गटाच्या माध्यमातुन महिलांचा सर्वागीन विकास होतो या साठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे व व्यवसाय करण्या करिता महिला पुढे आल्या तर प्रत्येक क्षेञात प्रगती होईल.मा. मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले एकल नृत्य मधुबाला ठाकुर,दिपाली तांबेकर,सुषमा शेंडे,गृपडांस गाडगेबाबा एएल एफ,स्वाभिमान,व सर्वस्वी,पथनाट्य झेप,धरती व रेश्मा घोडखांदे, रांगोळी स्पर्धा शालीनी तेलतुबंडे,नम्रता भुरे,शितल दुधकोहळे,इत्यादी महिलांना पारीतोषीक व प्रमाण पञ देण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन एस एम आय डी चिञा चाफले मँडम यांनी केले तर आभार लिखीता ठाकरे मँडम यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता भावना ठाकरे, रूपाली भाकरे, सारिका सबाने श्रेया बाभुळकर,या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले तसेच सारीका खैरकार जिल्हा संसाधन व्यक्ति, प्रिती मुंजेवार,चारुशिला पेठे,अर्चना हांडे,पुजा वाल्दे,करुणा मुन,अर्चना कोरडे,प्रियंका कुमरे,भारती भुरे,निलीमा गायकवाड,मनिषा भांबरे,दुर्गा मेश्राम,सुरेखा वाघाडे, शिवानी भटकर सुषमा दुपारे तसेच सर्व वस्तीत्तर संघा च्या अध्यक्ष,सचिव व बचत गटाच्या महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्या करिता मोलाचे सहकार्य केले.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये