गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चारचाकी वाहनासह गावडी मोहा दारू एकूण ३ लाख १४ हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्हयाची थोडक्यात हकीकत या प्रमाणे आहे की, मुखबीरचे खबरेवरून पंच व पो. स्टाफसह यातील नमुद आरोपी वर नाकेबंदी करून प्रो. रेड केला असता आरोपीच्या ताब्यातून 3,14,700/- चा मुद्देमाल गावडी मोहा दारू माल विना पास परवाना मिळुन आला 1) 07 प्लास्टीक डबकीत प्रत्येकी 14 लिटर प्रमाणे एकुण 98 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 150 रूपये प्रमाणे किंमत 14,700 /- रूपये, 2) एक जुनी वापरती मारोती सुझुकी कंपनीची मॉडेल झेण ईस्टेलो कारचा नोंदणी क्रमांक एम. एच. 29 आर 0131 असा असुन किमंत अंदाजे 3,00,00/- रूपये असा एकुण जुमला किंमती – 3,14,700 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून आरोपी शेख अरबाज रज्जाक कुरेशी वय 25 वर्ष, रा. आनंदनगर, वर्धा याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून पुढील कारवाईस पोस्टे वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आला

कारवाई सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड सर यांचे निर्देशाप्रमाणे स पो नि संतोष दरेकर, पो.हवा. गजानन लामसे, यशवंत गोल्हर, राजेन्द्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये