ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुल लाभार्थ्यांची शासनाद्वारे फसवणूक – राजू झोडे यांचा आरोप

शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा हवेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घरकुल लाभार्थ्यांना शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.मात्र चंद्रपुर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना अद्याप रेती उपलब्ध करून देण्यात आली नाही.त्यामुळं घरकुल लाभार्थ्यांची शासनाने फसवणूक केली असून अनेकांच्या घराचे स्वप्न अर्धवट राहिले आहे.

त्यामुळं जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव करावा किंवा लाभार्थ्यांना रेती स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात अनेक रेती घाट आहेत.या रेतीघाटांचा अद्याप शासनाने लिलाव केला नाही.परंतु रेती तस्कर दिवसरात्र रेतीची अवैध तस्करी करत असून ज्यादा भावाने रेतीची बेभानपणे विक्री करत आहेत.यात घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.तर एकट्या बल्लारपूर तालुक्यात एक हजार 242 घरकुल लाभार्थी असून रेती पुरवठा होत नसल्याने काम रखडले आहे.

शासकीय रेती उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण फोल ठरले असून जिल्ह्यातील रेती घाटांचा तात्काळ लिलाव करावा, तसेच शासनाने रेती शासकीय दराने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.यावेळी श्यामभाऊ झिलपे,संपत,गुरू कामटे,जाकिर खान, भगतसिंह झगड़ा,नविन डेविड पंचशील तामगाडगे, आदि उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये