ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिर 29 मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरात छत्रपती संभाजी नगर येथील काबरा हॉस्पिटल येथील नेत्र तज्ञ डॉ सौ वंदनाताई काबरा यांनी रुग्णांची तपासणी केली.

बाजार समितीच्या क्षेत्रातील व परिसरातील शेतकरी बांधव, गुरांचे व्यापारी, यार्डातील आडते, व्यापारी, हमाल, मापारी यांनी शिबिराचा लाभ घेतला.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दादाराव खार्डे, माजी संचालक अशोक शेळके, बबनराव डोके, सचिव किशोर मस्के, व इतर संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये