ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर ट्रॅक्टर पलटी

भीषण अपघातात 1 ठार तर 3 जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

       सिंदेवाही शहरालगत ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर लाकड़ाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने 1 जागीच ठार तर 3 गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. 10/3/2024 रोज रविवारला दुपारी 12.30 वाजता दरम्यान घडली आहे.

सविस्तर वृत असे की आज दि. 10/3/2024 रोज रविवार ला दुपारचा सुमारास कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकुड़ घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरचे समोरचे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चालकाचे ट्रॅक्टर वाहना वरुन नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर एका झाडाला जाऊन धडकले ही धडक ईतकी जोरदार होती कि, भीषण अपघात घडला

यात उमेश अशोक आदे वय 32 राहणार महात्मा फुले चौक सिंदेवाही हा जागिच ठार झाला असुन गंभीर जखमी मध्ये ट्रेक्टर चालक मुन्ना देवराव गावतुरे हमाल अनिल सदाशिव मोहुर्ले व सुखदेव विट्ठल गावतुरे हे सर्व राहणार सिंदेवाही हे तिघेही गंभीर जख्मी झाले याची माहिती पुलिस स्टेशन सिंदेवाहीला मिळताच तात्काळ पोलीस ठाणेदार चव्हाण आपल्या पथकासह घटना स्थळी जाऊन ट्रॅक्टर अपघातल्या ट्रॅक्टरमध्ये फसलेल्या जेसीबीच्या सहाय्याने मृतक व जखमी बाहेर काढले. व लगेच एम्बुलेंसचा सहाय्याने शहरातील ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले.

सदर घठणेचा पुढील तपास पोलिस ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये