ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायबर जागृती यात्रा

मुंबई येथील शोध प्रबंध चमू वर्धा दौऱ्यावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, गृह विभाग, मुंबई यांचे मार्गदर्शनात एच.आर. कॉलेज, कॉमर्स अॅन्ड इकॉनॉमीक्स, मुंबई यांचेतर्फे विदर्भातील तरूण वर्गामध्ये सायबर जागृती व त्या अनूषंगाने लघू संशोधन प्रकल्पाकरीता माहिती संकलीत करणेकामी मुख्य संशोधक डॉ. श्री. नवीन पंजाबी यांचे अध्यक्षतेमध्ये “सायबर जागृती यात्रा” चे आयोजन करण्यात आले आहे. शोध प्रबंधादरम्यान ते वर्धा, चंद्रपूर, गडचीरोली, गोंदीया, भंडारा, अमरावती, अकोला, बूलढाणा, वाशीम येथील महाविद्यालयांना भेटी देणार आहेत.

सदर यात्रेदरम्यान डॉ. श्री. नवीन पंजाबी व त्यांची टिम श्री. समन्वय सहगल, श्री. गर्व नैनवानी, श्री. राहून माखीजा, श्रीमती संजना चूघ, श्रीमती रेणूका राव सर्व तृतीय वर्ष वाणीज्य शाखेचे विद्यार्थी, एच. आर. कॉलेज मुंबई हे दिनांक 08.02.2024 रोजी वर्धा येथे आले होते.

त्या दरम्यान त्यांनी सायबर सेल वर्धा यांचे सोबत वर्धा शहरातील वेगवेगळया कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व त्यांना प्रतिबंध करण्याचे उपाय संबंधाने संवाद साधला. तसेच विद्यार्थांकडून त्यांचे सायबर ज्ञानाबाबत माहिती घेतली व ऑनलाईन पध्दतीने त्यांचेकडून फॉर्म भरून घेतले.

सदर यात्रेदरम्यान 1) यशवंत महाविद्यालय, वर्धा, 2) श्रीकृष्ण जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पीपरी मेघे वर्धा, 3) लोक महाविद्यालय, वर्धा 4) बापूराव देशमूख कॉलेज ऑफ इंजीनीयरींग, सेवाग्राम येथे कार्यक्रम घेण्यात आले.

सदर यात्रेदरम्यान संबंधीत संशोधन प्रकल्पातील मान्यवरांनी इंन्स्टाग्राम, फेसबूक, व्हॉट्सअॅप व इतर सोशल मिडीयाचे वापराबाबत सतर्कतेचा इशारा दिला. तसेच वाढते सेक्सटॉर्शन फ्रॉड, टास्क फ्रॉड, माहिती शासनातर्फे हरविलेले मोबाईल शोध व ऑनलाईन फसवणूक थांबविण्याकरीता सुरू करण्यात आलेले सी.ई.आय.आर. पोर्टल व एन.सी.सी.आर.पी. पोर्टल यांचे संबंधाने माहती देण्यात आली. तसेच सदरची माहिती आपले पालक, नातेवाईक व मित्रपरीवार यांना सुध्दा सतर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. सायबर सेल वर्धा तर्फे पो.हवा. कुलदीप टांकसाळे, पो.हवा. निलेश कट्ट्टोजवार, म.पो.शि. स्मिता महाजन यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

“सायबर जागृती यात्रा” ला प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. श्री. सागर रतनकूमार कवडे, पोलीस निरीक्षक सायबर पो.स्टे. श्री. कांचन पांडे यांनी शुभेच्छा दिल्या. वर्धा शहरातील “सायबर जागृती यात्रा” चे आयोजनाकरीता पो.हवा. दिनेश बोथकर, पो.हवा. कुलदीप टांकसाळे, पो.हवा. निलेश कट्ट्टोजवार, पो. हवा. अनूप कावळे, पो.हवा. गोंवीद मुंडे, म.पो.शि. स्मिता महाजन यांनी तसेच संबंधीत महाविद्यलयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान एकूण 600 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये