ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

अखेर पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतरच ते दारू दुकान स्थलांतरीत करण्याच्या सुचना

पालकमंत्र्यांच्या कानउघाडणीने दारूबंदी विभागाला अखेर आला जाग ती देशी दारू भट्टी स्थलांतित करण्याकरिता जागेच्या शोधा शोध सुरू

चांदा ब्लास्ट

माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या पुढाकार

स्थानिक जगन्नाथ महाराज मठ परिसरातील रामसेतू पुलाच्या पायथ्याशी असलेले देशी दारू दुकान अखेर पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर स्थलांतरीत करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आलेल्या आहेत. सदर दुकान स्थलांतरीत व्हावे, याकरीता माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी मोठे जनआंदोलन केले होते. जगन्नाथबाबा मठ व रामसेतू पुल या रहिवासी परिसरात नवीन देशी दारूभट्टीला परवानगी देण्यात आली आहे. या देशी दारू दुकानामुळे स्थानिक रहिवासी व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय या परिसरात धार्मिकस्थळ असल्याने परिसराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या देशी दारू दुकानाला येथून हटविण्याची जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी केली. तसेच जगन्नाथबाबा नगरातील नागरिकांनी माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी आक्रमक भूमिका घेत स्थानिक नागरिकांना सोबत घेवून आंदोलनही केले. दरम्यान लोकशाही मार्गाने निवेदने देवून पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. देशी दारू दुकान या पवित्र ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी सुरू असताना देशी दारू दुकान उघडण्याचा वारंवार प्रयत्न संबंधितांकडून  केला जात होता. याची माहिती मिळताच माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या सतरतेमुळे व राजकीय पाठबळा मुळेच वारंवार सुरू केलेली देशी दारू भट्टी अनेकदा त्यांनी बंद पाडली उत्पादन शुल्क विभाग कोणतीच कारवाई करण्यात समर्थपणा दाखवत नव्हते असे प्रकार सुरू असताना अखेर सदर देशी दारू दुकान जगन्नाथबाबा मठ परिसर ठिकाणाहून रद्द करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेवूनच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने नियोजन भवनात बैठक लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सदर देशी दारु दुकानाला या पवित्र ठिकाणाहून लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात सूचना जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना  नियोजन भवनात झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. त्यानंतर आता देशी दारु दुकान स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सूचनेमुळे  लवकरच यापरिसरातील नागरिकांची या समस्येतून सुटका होणारच आहे.
राहुल पावडेंच्या प्रयत्नांना ना. सुधीर मुनगंटीवारांचे बळ

मागील दीड वर्षाच्या काळात उत्पादन शुल्क विभागाकडून अनेक भागात देशी दारू दुकानांना परवानगी देण्यात आली. अशीच परवानगी जगन्नाथ बाबा मठ परिसरातील देशी दारू दुकानालाही देण्यात आली. मात्र काही भागांमध्ये लोकांनी या दारु दुकानाला विरोध केला, तरी सुद्धा त्या भागात देशी दारू दुकान सुरूच आहे. मात्र जगन्नाथ बाबा परिसरातील देशीदारू दुकान हे कोणत्याही परिस्थितीत हटविण्यासाठी माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी स्थानिक नागरिकांसह आक्रमक पवित्रा घेतला. उत्पादन शुल्क विभाग व दारु व्यावसायिकांचे मनसुबे हानून पाडले. शासन व प्रशासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या सर्वाला लोकनेते ना. सुधीर मुनगंटीवार यांचे बळ मिळाले. परिणामी पोलिस विभाग व प्रशासनाला सुद्धा यावर सक्तीने कारवाई करणे भाग पाडले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये