ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकास कामांसाठी कधीही तडजोड करणार नाही. – आ. धानोरकर

वरोरा-भद्रावती तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमीपुजन

चांदा ब्लास्ट

जनतेने आम्हा लोकप्रतिनिधींना शासन दरबारी पाठपुरावा करून सर्वांगीण विकास कामांना गती देण्याकरिता निवडून दिले असून विकास कामे करणे ही आमची जबाबदरी असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. या विकास कामांसाठी कधीही तडजोड करणार नसल्याची भावना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध विकास कामांच्या लोकार्पण व भुमीपुजन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या.

शासनाच्या विविध निधी अंतर्गत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात निधी खेचून आणला असून त्या निधी च्या माध्यमातून विविध कामांचे लोकार्पण व भुमीपुजन आमदार महोदयाच्या हस्ते करण्यात आले. आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा वार्षिक योजना निधी, अर्थ संकल्पीय निधी, ग्राम विकास निधी, जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजना निधी, जन सुविधा निधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल डेव्हलपमेंट प्रोग्राम यासारख्या योजनेच्या माध्यमातून 43 कोटी रुपयाच्या कामांचे लोकार्पण व भुमीपूजन करण्यात आले असून यामध्ये सिमेंट कॉक्रीट रस्ते, समाज भवन, स्मशान भुमी संदर्भातील कामे, रस्त्यांचे खडीकरण व मजबूतीकरण, कर्मचाऱ्याची निवास स्थाने, नागरीक सुविधा कक्ष, स्ट्रीट लाईट, आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम यांसारख्या इतर बांधकामाचा देखील समावेश आहे. जनतेने आपली केलेली निवड सार्थ ठरविण्याच्या उद्देशातून काम करणे गरजेचे असल्याचे मत देखील आमदार धानोरकर यांनी व्यक्त केले.

जनतेच्या दालनात विकास काम करण्याची खरी कसोटी असून त्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न करण्यास मी सक्षम असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. वरोरा-भद्रावती नव्हेच तर कुठल्याही क्षेत्रातील कामासंदर्भात मी आढावा घेऊन विकासात्मक कामे करण्यासंदर्भात कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेला पाहिजे असलेला अपेक्षीत विकास आपण करण्यास कटीबध्द आहोत, असे उद्गार देखील त्यांनी भूमीपुजन व लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले.

भविष्यातील काळात हा विकासाचा वारसा आणखी पुढे नेऊन आपल्या कार्याला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भूमीपुजन केलेले कामे तात्काळ पुर्णत्वास नेण्याच्या सुचना संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये