ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध विदेशी दारूविक्रेता जेलबंद

पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 05.12.2025 रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस अधिकारी /अंमलदारांनी केलेल्या कार्यवाहीत अवैध्य दारूविक्रेता प्रसाद भगवानजी साहु रा. मालगुजारीपुरा, वर्धा याचेवर दारूबंदी कायदयाअन्वये कार्यवाही करून आरोपीस अटक करण्यात आली. दि. 05.12.2025 रोजी मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर खबरेची तात्काळ दखल घेत अवैध्य दारूविकता प्रसाद भगवानजी साहु रा. मालगुजारीपुरा, वर्धा याचे राहते घराची पंचासमक्ष कायदेशीर घरझडती घेतली असता.,,

आरोपीचे घरझडतीत अवैध्यरित्या बिनापासपरवाना वेगवेगळ्या कम्पणीच्या 180 एम.एल. विदेशी दारूने भरलेल्या एकुण 186 बॉटल तसेच वेगवेगळ्या कम्पणीच्या 500 एम.एल.च्या 30 बिअर बॉटल असा एकुण जु. कि. 66500 रू चा माल मिळुन आल्याने जप्त केला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष ताले यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, अभिजीत वाघमारे, चालक अजीम शेख, आकाश व इतर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये