ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैनगंगा नदीतून रेतीची सर्रास चोरी.,घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळेना

नवनियुक्त तहसीलदार तालुक्यातील अवैद्य वाळू उत्खनन थांबवतील का?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

     तालुक्यात लगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर रेती नसतांना रेतीघाट बनवून रेती, बद्रीच्या चोरट्या वाहतुकीला उधाण येत असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते. सदर प्रकार तालुक्यातील उसेगाव व इतर घाटातून मोठ्या प्रमाणात सुरू असून गौण खनिज साहित्य चोरीच्या अशा गंभीर बाबींकडे कुणी वरीष्ठ अधिकारी लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे. तर नवनियुक्त तहसीलदार याकडे लक्ष देतील का असा सवाल नागरिकाकडून होत आहे.

तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा विकास कामांना सुरुवात झाली आणि शासनाच्या जन कल्याण कारी योजनातुन तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल सुरू आहेत. अशा कामाकडे लक्ष केंद्रीत करून रेती, बद्री चोरीचा घडाका चोरट्या मार्गाने सुरू आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना द्वारे मोठ्या प्रमाणात गोर-गरिबांना घरकुल मिळालेले आहेत. या कामात रेतीची नितांत आवश्यकता मात्र रेती घाट सुरु नसल्याने रेती तस्कर मनमानी भाव घेत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागतं आहे, सामान्य माणसांना रेतीचीमोठ्या प्रमाणात तस्करी करताना दिसून येत आहे. या मूळे सामान्य माणसाची आर्थिक गळचेपी झाली.याचाच फायदा घेत भर दिवसा रेती बद्रीचे भाव दुपट्ट करून सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावण्याचा काम तस्कर सुरू आहे.

सावली तालुक्यालगत वैनगंगा नदीवर अनेक रेती घाट आहेत. तर या व्यतिरिक्त रेती तस्कर. स्वतः नदीवर रेती घाट बनवून यातून रेती, बद्रीची मोठी तस्करी करीत आहेत. विशेष म्हणजे तालुक्यालगत वैनगंगा नदीवर, पाच, सहा रेती घाट असुन गेल्या ६ महिन्यापासून लिलाव झाला नसल्याचे महसूल विभागाकडून सांगितले जात आहे. मग रेतीची मोठ मोठी ढिगारे, घाट बनवून रेती, बद्रीची चोरटी वाहतूक कुणाच्या आर्शिवादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गौण खनिज साहित्याची चोरटी वाहतूक करून शासनाचा लाखो रुपये महसूल बुडविण्याच्या या प्रकारात स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. चोरट्या रेती, बद्रीची जादा भावाने विक्री केली जात असल्याने सामान्य माणसाची आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे. अशा चोरट्या वाहतुकीमुळे लगतच्या रस्त्याची मोठी वाट लागत असुन रस्त्यावर अल्पावधीतच मोठे जिवघेणे खड्डे निर्माण होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये